शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
3
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
4
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
5
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
6
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
7
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
8
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
9
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
10
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
11
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
12
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
13
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
14
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
15
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

भारतीय कंटेनर महामंडळाकडून कंटेनर स्वीकारण्यास तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 03, 2020 12:40 PM

रेल्वेच्या जागेऐवजी पर्यायी जागांचा शोध सुरू ?

जळगाव :  भारतीय कंटेनर महामंडळाकडून भुसावळ येथील आगार बंद करण्यासंदर्भात हालचाली सुरू झाल्याने विषयी ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करताच कंटेनगर महामंडळाने सध्या उद्योजकांकडून कंटेनर स्वीकारण्याची तयारी दर्शविली आहे. त्यानुसार शनिवारी काही कंटेनरदेखील भुसावळ येथे पाठविण्यात आले. दरम्यान, रेल्वेने जागेची भाडेवाढ केली असली तरी महामंडळाकडून आता पर्यायी जागांचा शोध सुरू झाला असल्याचे वृत्त आहे.जिल्ह्यातील आयात-निर्यातीसाठी सोयीचे असलेले भुसावळ येथील भारतीय कंटेनर महामंडळाचे आगार बंद करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला व तशा नोटीस उद्योजक व संबंधितांना दिल्या होत्या. या संदर्भात ‘लोकमत’ने सविस्तर वृत्त प्रकाशित केले. त्यानंतर खासदार रक्षा खडसे, उन्मेष पाटील यांनी महामंडळाच्या अधिकाºयांशी चर्चा केली होती.या सोबतच ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केल्यानंतर महामंडळाने सध्या माल निर्यातीसाठीचे कंटेनर स्वीकारण्याची तयारी दर्शविली आहे.  त्यानुसार शनिवारी मालदेखील रवाना झाला.खान्देशातील उद्योग-व्यावसायिकांकडून होणाºया व्यवहारांमुळे या आगारात दरवर्षी आयातीचे एक हजार कोटी तर निर्यातीचे ७०० कोटी रुपये अशी एकूण १७०० कोटी रुपयांची उलाढाल होत असते. मात्र आगार बंद करण्याच्या निर्णयाने महामंडळ या उलाढालीवर पाणी सोडण्याच्या तयारीत आहे.  शिवाय यामुळे उद्योजक-व्यावसायिकांचे मोठे नुकसान होणार आहे. हे आगार बंद झाल्यास माल पोहचविण्यासाठी व आणण्यासाठी थेट मुंबई येथे जाण्याशिवाय पर्याय राहणार नाही. यामुळे आर्थिक बोझा वाढणार असून त्यामुळे किंमतीवरही परिणाम होऊ शकतो. मात्र आता ‘लोकमत’च्या वृत्तानंतर कंटेनर घेण्याची तयारी महामंडळाने दाखविल्याने उद्योजक, व्यावसायिकांना दिलासा मिळाला आहे.  महामंडळाकडून पर्यायी जागेचा शोधमहामंडळाच्या भुसावळ येथील जागेची रेल्वेने भाडेवाढ केल्याने हे आगार बंद करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला. मात्र ‘लोकमत’च्या वृत्तानंतर महामंडळाकडून पर्यायी जागेचा शोध सुरू असल्याची विश्वसनीय माहिती आहे. त्यानुसार हे आगार जिल्ह्यात कायम राहणार असल्याचे संकेत आहेत.कामगार, शेतकºयांनाही होणार आधारभारतीय कंटेनर महामंडळाच्या भुसावळ येथील आगारात वेगवेगळ््या कामांसाठी जवळपास १०० कामगार असून कंपन्यांमधील मजूर यांनाही याचा फटका बसणार आहे. सोबतच निर्यात थांबल्यास शेती मालही पडून राहून शेतकºयांना फटका बसू शकतो. मात्र आता निर्णय बदलल्यास त्याचा कामगार, शेतकºयांनाही आधार होणार आहे. तसेच ३० ते ३५ देशात होणारी निर्यात कायम राहून विदेशी चलन मिळण्यास मोठा हातभार मिळेल.  

टॅग्स :Jalgaonजळगाव