ठळक मुद्देवसुली प्ररकणामध्ये १२ लाखांची वसुलीनऊ प्रलंबित, तर चार दाखलपूर्व प्रकरणांचा निपटारा
यावल, जि.जळगाव : यावल येथील न्यायालयात न्यायाधीश डी.जी.जगताप यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आले होते. या न्यायालयात नऊ प्रलंबित, तर चार दाखलपूर्व अशा १३ प्रकरणांचा आपसात तडजोडीअंती निपटारा करण्यात आला. वसुली प्रकरणांंतर्गत ११ लाख ६९ हजार ८५३ रुपयांची वसुली झाली आहे.वकील संघाचे अध्यक्ष अॅड.एन.पी.पाटील, सचिव के.डी. सोनवणे हे पॅनलप्रमुख होते. अॅड.नितीन चौधरी, ए.आर.सुरळकर, ए.एम.कुळकर्णी, यु.सी.बडगुजर यांच्यासह वकील मंडळी व न्यायालयीन कर्मचारी उपस्थित होते.लोकन्यायालय यशस्वितेसाठी आर.एम.वडनेरे, डी. जे.साळी, बागुल, डी.जी.चौधरी, के.एस.पाटील, सतीश आठवले, एम.बी.चौधरी, आर.डी.शिंपी, एम.बी.चौधरी, एस.आर.तडवी आदींनी परिश्रम घेतले.