ऑनलाईन लोकमत विशेष
जळगाव, दि.10- शाश्वत सिंचनाच्या माध्यमातून शेतीचा विकास होण्यासाठी जलयुक्त शिवार अभियानाची आखणी करीत जिल्ह्यात झालेल्या जलयुक्त शिवार योजनेच्या कामांचे सादरीकरण जिल्हा प्रशासनातर्फे तयार करण्यात आलेल्या ‘कॉफी टेबल बुक’ च्या माध्यमातून करण्यात आले आहे.
*दुष्काळमुक्तीकडे नेणारे जलयुक्त शिवार*
सर्वासाठी पाणी टंचाईमुक्त महाराष्ट्र 2019 अंतर्गत राज्य शासनातर्फे जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात येत आहे. दुष्काळमुक्तीसाठी जलयुक्त शिवार अभियानाची गरज, या अभियानाची व्याप्ती, अभियानातंर्गत करण्यात येणारी कामे आणि कालावधी यासारख्या आवश्यक उपाययोजनांची तांत्रिक माहिती या पुस्तकात देण्यात आली आहे. यासोबत जिल्हास्तरीय आराखडय़ात जलयुक्त शिवार अभियानासाठी यंत्रणानिहाय कामांचा आराखडा सादर केला आहे. तत्कालिन जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल व विद्यमान जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्या संकल्पनेतून तयार झालेल्या पुस्तकाचे प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी मिलींद दुसाने यांनी संपादन केले आहे.
* क्यूआर कोड्सद्वारे नागरिकांर्पयत विस्तृत माहिती *
‘जलयुक्त जळगाव’ या कॉफी टेबल पुस्तकातील आशय हा इंटरनेटवरील वेबपेजमध्ये स्टोअर केला आहे. स्मार्ट फोन किंवा कॅमे:याद्वारे हा कोड स्कॅन करून जलयुक्त जळगावचे वेबपेज ओपन करता येणार आहे. क्यूआर कोड्सच्या माध्यमातून ‘जलयुक्त जळगाव’ या पुस्तकातील विस्तृत माहिती ही अधिकाधिक नागरिकांर्पयत पोहचविण्याचा प्रयत्न जिल्हा प्रशासनाने केला आहे. क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर वाचकाचा वेळ आणि श्रम वाचणार आहे.
* जळगाव तालुक्यातील 15 गावांचा पाण्याचा ताळेबंद *
जलयुक्त शिवार अभियानातंर्गत गेल्या वर्षी निवडण्यात आलेल्या 232 गावांमध्ये ग्रामस्थ, क्षेत्रीय अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत शिवार फे:या आयोजित करीत प्रत्येक गावाचा पाण्याचा ताळेबंद केला आहे. जळगाव तालुक्यातील उमाळे, कंडारी, देव्हारी, शिरसोली, प्र.न. व प्र.बो., सुभाषवाडी, वडली, वसंतवाडी, नशिराबाद, निमगाव बुद्रुक, शेळगाव, आसोदा या 15 गावांचा त्यात समावेश केला आहे. या ताळेबंद मध्ये गावाचे भौगोलिक क्षेत्र, गावाला लागणारे पाणी, पावसामुळे उपलब्ध होणारे पाणी, जुन्या कामांमुळे अडवलेले पाणी, जलयुक्त शिवार अभियानामुळे अडविले जाणारे पाणी तसेच त्या गावासाठी कमी पडणारे किंवा जास्तीच्या पाण्याचा ताळेबंद पुस्तिकेत दिला आहे.
* जलयुक्त शिवारमुळे 58 हजार टीसीएम साठा *
कॉफी टेबल पुस्तकात जलयुक्त शिवार अभियानामुळे जिल्ह्यात 58 हजार 549.41 टीसीएम पाण्याची साठवण क्षमता निर्माण झाली असून 57 हजार 512 हेक्टर संरक्षित सिंचन क्षेत्र तयार झाल्याचा दावा करण्यात आला आहे. या अभियानामुळे टँकर्सच्या संख्येत देखील घट झाल्याचा दावा केला आहे.
* जिल्ह्यातील जलसमृद्धीची सचित्र यशोगाथा *
पुस्तकात चाळीसगाव तालुक्यातील खेडगाव, माळशेवगे, वाकडी, अमळनेर तालुक्यातील नगाव, पारोळा तालुक्यातील तरवाडे खुर्द, भडगाव तालुक्यातील वलवाडी, मळगाव, पाचोरा तालुक्यातील लोहारा, एरंडोल तालुक्यातील पिंपळकोठा, जळगाव तालुक्यातील कडगाव, कंडारी, जामनेर तालुक्यातील वाकोद, देऊळगाव, गोंदेगाव, पहूर, रावेर तालुक्यातील लालमाती, वढोदा, भुसावळ तालुक्यातील कु:हे पानाचे या गावातील जलयुक्त शिवार योजनेतील कामांच्या यशोगाथा प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. यासोबतच शेतकरी व शासकीय अधिका:यांचे मनोगत देण्यात आले आहे.