गोपाळ व्यासबोदवड, जि.जळगाव : येथील नगराध्यक्ष पदाची निवडणूक ऐनवेळी जाहीर झाल्याने नगरसेवकही त्याबाबत अनभिज्ञ असल्याचे निदर्शनास आले. यामुळे या प्रकाराने अचंबित झालेले नगरसेवक राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहेत. गुरुवारी पहिल्या दिवशी एकही अर्ज दाखल झाला नाही. शुक्रवारी अर्ज दाखल करण्याचा दुसरा व शेवटचा दिवस आहे.बोदवड येथील नगराध्यक्षा मुमताजबी बागवान यांची अडीच वर्षांची मुदत २२ जून रोजी संपत आहे. यामुळे या महिन्यात निवडणूक होणे अपेक्षित आहे. असे असताना १२ जून रोजी सायंकाळी बोदवड पालिकेत जिल्हा प्रशासनाकडून निवडणुकीबाबत पत्र आले. यानंतर दुसऱ्या दिवशी १३ जून रोजी या पत्रांचे वाटप नगरसेवकांना करण्यात आले. ही निवडणूक प्रक्रिया १३ जूनपासून सुरू होणार असल्याचे त्यात नमूद करण्यात आले. पत्र हाताच पडताच नगरसेवकही आश्चर्यचकित झाले. निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याविषयी सुचविल्याने सर्वांनाच धक्का बसला. यामुळे नगरसेवक संतप्त झाले. या प्रकाराबद्दल राज्य निवडणूक आयोगाकडे दाद मागणार असल्याची भूमिका नगरसेवकांनी घेतली आहे.नगरसेवकांना प्राप्त पत्रानुसार १३ जून रोजी नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल करण्याचा पहिला दिवस होता. ऐनवेळी पत्र हातात पडल्यामुळे आज पहिल्या दिवशी एकही अर्ज दाखल झाला नाही. आता शुक्रवार, दि.१४ जून हा अर्ज दाखल करण्याचा दुसरा व शेवटचा दिवस आहे.१६ जून रोजी अर्जांची छाननी होईल. माघारीची अंतिम मुदत १९ जून आहे. २१ जून रोजी निवडणूक होईल आणि दुसºया दिवशी २२ जून रोजी नूतन नगराध्यक्षांनी पदभार स्वीकारल्यानंतर उपनगराध्यक्ष पदासाठी निवडणूक होईल.दरम्यान, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी चंद्रकांत भोसले रजेवर असल्याने त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. तथापि, कार्यालय अधीक्षक राजूसिंग चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, १२ रोजी सायंकाळी हे पत्र आम्हाला मिळाले. आज त्यांचे नगरसेवकांना वाटप केले.नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या दिवशीच ऐनवेळी पत्र मिळाले. निवडणुकीच्या किमान तीन दिवस आधी ते हातात पडणे आवश्यक आहे. जिल्हा प्रशासनाच्या या प्रकाराबद्दल राज्य निवडणूक आयोगाकडे आपण तक्रार करणार आहोत.-दीपक झाबक, नगरसेवक, बोदवड
बोदवड नगराध्यक्ष निवडणुकीबाबत नगरसेवक अनभिज्ञ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2019 3:31 PM
बोदवड येथील नगराध्यक्ष पदाची निवडणूक ऐनवेळी जाहीर झाल्याने नगरसेवकही त्याबाबत अनभिज्ञ असल्याचे निदर्शनास आले. यामुळे या प्रकाराने अचंबित झालेले नगरसेवक राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहेत.
ठळक मुद्देनगरसेवक राज्य निवडणूक आयोगाकडे करणार तक्रारऐनवेळी आले निवडणुकीचे पत्रकपहिल्या दिवशी एकही अर्ज नाहीअर्ज भरण्याचा आज दुसरा व शेवटचा दिवस