जळगाव- पोलीस दलात उल्लेखनीय व प्रशंसनीय कामगिरी केल्याबद्दल १५ ऑगस्ट म्हणजेच स्वातंत्र्य दिना निमित्ताने जिल्हा पोलीस दलात कार्यरत असलेल्या 5 जणांना राष्ट्रपतींचे पोलीस पदक जाहिर झाले आहे. पोलीस कवायत मैदानावर सोमवारी पालकमंत्र्यांच्या हस्ते हे पदक बहाल केले जाणार आहे.
केंद्रीय गृहमंत्रालयाने पोलिसांसह सुरक्षायंत्रणेतील वेगवेगळ्या विभागातील पदकप्राप्त अधिकारी व कर्मचाऱ्यांची यादी १४ ऑगस्ट रोजी जाहिर केली. जळगाव पोलीस दलातील जिल्हा पेठ पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक प्रदीप पंढरीनाथ चांदेलकर, जळगाव तालुका पोलीस ठाण्याचे सहायक फौजदार विजय देवराम पाटील, माणिक सोनाजी सपकाळे, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे सुरेश पंडित पाटील व मोटार वाहन विभागाचे प्रदीप राजाराम चिरमाडे यांचा त्यात समावेश आहे.
पोलीस कवायत मैदानावर सोमवारी होणाऱ्या कार्यक्रमात या सर्व पदकप्राप्त पोलीस अधिकारी, अमलदारांचा पालकमंत्री, जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या हस्ते गौरव केला जाणार आहे.