जळगाव,दि.20- जिल्हा परिषदेच्या स्वनिधीतून (सेस फंड) दोन कोटी रुपयांची हायमास्टच्या कामांची फाईल ‘बॅकडेटेड’ दाखवून ती मार्गी लावून घेण्यासाठी जि.प.मधील एका माजी पदाधिका:याच्या पतीने मंत्र्यांचे नाव सांगून जि.प.तील एका वरिष्ठ अधिका:यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. पण संबंधित अधिका:यानेही आम्ही चुकीचे कामे करणार नाही.. हवे तर त्याविषयी मंत्र्यांशी आम्ही बोलू, असे सांगून ही फाईल मार्गी लावण्यास नकार दिला आहे. याच प्रकाराची कुणकुण जि.प.तील विद्यमान विरोधकांच्या लक्षात आल्याने त्यांनी जि.प.च्या काम वाटप समितीचे 2016 -17 या वर्षाचे इतिवृत्त मागितले आहे.
जि.प.तील काही माजी पदाधिकारी, सदस्यांनी काही विद्यमान पदाधिका:यांना सोबत घेऊन हायमास्टच्या कामांची दोन कोटींची फाईल फिरविली. 2016 -17 च्या आर्थिक वर्षाच्या कामांमध्ये ही कामे समाविष्ट करून घेण्यासाठीची ही बॅकडेटेड फाईल एका वरिष्ठ अधिका:याकडे अंतिम मंजुरीसाठी आली. ही फाईल फिरविण्यासाठी बांधकाम विभागातील एका कर्मचा:याची मदत घेतली. हा कर्मचारी जि.प.मध्ये न येताच हा सर्व प्रकार मार्गी लावण्याची विशेष जबाबदारी पार पाडत होता.