जळगाव : घनकचरा प्रकल्प व्यवस्थापनातंर्गत शहरात उभारण्यात येणाऱ्या बायोमायनिंग प्रकल्पाचा मक्ता आपल्याच जवळच्या मक्तेदाराला मिळावा यासाठी एका बड्या पदाधिकाºयाकडून प्रशासनावर दबाव टाकण्यात येत आहे. याबाबत मनपाच्या विश्वसनीय सूत्रांनी ह्यलोकमतह्ण ला माहिती दिली आहे.गेल्या काही महिन्यांपासून मनपाकडून काढण्यात येणाºया प्रमुख कामांच्या निविदांमध्ये राजकीय हस्तक्षेप वाढला असून, आता बायोमायनिंग प्रकल्पाच्या निविदेतही पदाधिकाऱ्यांकडून दबाव टाकून ठराविक मक्तेदारासाठी फिल्डींग लावण्यात येत आहे.बायोमायनिंग प्रकल्पासाठी ४ कोटी रुपयांची निविदा काढण्यात आली आहे. ही निविदा ९ जुलै रोजी उघडण्यात येणार आहे. यामध्ये किती निविदाधारकांनी निविदा भरली आहे.याबाबतची माहिती सध्या उपलब्ध नसली तरी एका ठराविक मक्तेदारासाठी सत्ताधारी भाजपच्या एका बड्या पदाधिकाºयाकडून दबाव टाकला जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.याआधीही दबावाचे आरोपमनपाकडून शहराच्या एकमुस्त सफाईसाठी काढण्यात आलेल्या ७५ कोटीच्या निविदेत देखील नाशिकच्या वॉटरग्रेस कंपनीला मक्ता देण्यासाठी राजकीय दबाव होता असा आरोप विरोधकांकडून करण्यात आला होता. भाजपातील काही पदाधिकाऱ्यांनी देखील याबाबत खासगीत आरोप केले होते. मलनिस्सारण योजनेतही अशाच प्रकारे आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहेत. बायोमायनिंग प्रकल्प हा शहराच्या दृष्टीने महत्वाचा प्रकल्प असून, या प्रकल्पाच्या कामात देखील राजकीय हस्तक्षेप वाढत असेल तर आयुक्तांनी वैयक्तिक लक्ष घालणची गरज आहे.घनकचरा प्रकल्पाच्या निविदा काढूनही प्रतिसाद मिळेनाघनकचरा प्रकल्पासाठी मनपाकडून एकूण १३ कोटी रुपयांची निविदा काढली असून, या निविदेला प्रतीसाद मिळालेला नाही. सात वर्षांपासून हा प्रकल्प बंद असून त्यामुळे लाखो टन कचºयावर कुठलीही प्रक्रिया करता येत नसलेला तो कचरा पडून आहे. तसेच या ठिकाणच्या कचºयाला आग लागून विषारी धुरर परिसरात पसरत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. मनपाकडून आता पुन्हा नव्याने निविदा काढण्यात येणार आहे.सफाईच्या कामाला सुरुवात केव्हा ?मनपाकडून शहरात एकमुस्त सफाईचा ठेका नाशिक येथील वॉटरग्रेस कंपनीला देण्यात आला आहे. या ठेक्याला मनपाच्या महासभेने मंजुरी देवून एक महिना झाला असून, अजूनही कंपनीकडून शहराच्या सफाईच्या कामाला सुरुवात झालेली नाही. महासभेने मंजुरी दिल्यानंतर महिनाभरात हा मक्ता सुरु होणे अपेक्षित होते. मात्र, अजूनही कोणत्याही हालचाली मनपाकडून दिसून येत नाही.