आज भाजपाची बैठक शक्य : काँग्रेसला सभापतीपद देण्यासाठी एक गटाचा होकार
जळगाव, दि.30- रावेर लोकसभा मतदारसंघात भाजपाचे 22 सदस्य निवडून आल्याने या मतदारसंघात चारपैकी तीन सभापतीपदे खेचण्यासाठी भाजपाचा एक सक्रिय असतानाच जळगाव लोकसभा मतदारसंघात दोन सभापतीपदे दिली जावीत यासाठी दुस:या गटाने दबावतंत्राचा वापर सुरू केला आहे.
जि.प.मधील कृषी व पशुसंवर्धन, आरोग्य व शिक्षण, क्रीडा, महिला व बालकल्याण आणि समाज कल्याण या सभापतीपदाची निवड येत्या 1 एप्रिल रोजी जि.प.च्या छत्रपती शाहू महाराज सभागृहात होणार आहे. दुपारी 3 वाजता त्यासाठी विशेष सभा होईल. सदस्य हात उंचावून मतदान करतील. तत्पूर्वी सकाळी 11 ते दुपारी 1 र्पयत नामनिर्देशनपत्र दाखल करता येतील. तर दुपारी 3 नंतर 15 मिनिटे माघारीसाठी वेळ राहील. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रांत जलज शर्मा उपस्थित राहतील.
जि.प.त काँग्रेसच्या पाठिंब्याने सत्तेत आलेल्या भाजपाच्या सदस्यांमध्ये सभापतीपदासाठी रस्सीखेच सुरू आहे. जामनेर, भुसावळ, मुक्ताईनगर, रावेर, चोपडा, जळगाव, धरणगाव, चाळीसगाव या तालुक्यांमधील सदस्यांमध्ये चढाओढ सुरू आहे.
समाज कल्याण व महिला व बालकल्याण सभापतीपदे प्रघातानुसार महिलांना दिली जातात. समाज कल्याण सभापतीपदावर मागासवर्गीय किंवा अनुसूचित जमाती प्रवर्गातील महिला सदस्याची नेमणूक केली जाते. शिक्षण हे महत्त्वाचे सभापतीपद असून, जामनेरात हे पद जाण्याची शक्यता आहे. तर कृषी व पशुसंवर्धन सभापतीपद जळगाव किंवा चाळीसगावात येऊ शकते.
काँग्रेसला पद देण्यासाठी एका गटाकडून आग्रह
काँग्रेसने भाजपाला बिनशर्त मदत केलेली असल्याने काँग्रेसला पाच वर्षासाठी सभापतीपद दिले जावे.. यामुळे पाठिंब्यासाठी कुणाची मदत मागण्याची वेळ येणार नाही, असा आग्रह एका गटाकडून सुरू आहे. पण त्यास एका गटाने विरोध केला असून, पक्षासाठी लोकसभा, विधानसभा निवडणुकीत मेहनत घेणा:या चार व्यक्तींना या अडीच वर्षासाठी सभापतीपदे दिली जावीत.. अडीच वर्षानंतर विधानसभा निवडणुका असल्याने दुस:या टर्ममध्ये राजकीय गणिते, जातीय समीकरणे महत्त्वाची असती. त्यानुसारच पुढे सभापतींची निवड करावी लागेल..असा सूर काही पदाधिका:यांचा आहे. यातच याबाबतचा अंतिम निर्णय 31 रोजी भाजपा नेत्यांच्या बैठकीत होण्याची शक्यता आहे. जलसंपदामंत्री गिरीश महाजन, एकनाथराव खडसे हे शुक्रवारी शहरात दाखल होणार असून, त्यांच्या बैठकीत निर्णय होऊ शकतो, असे सांगण्यात आले.