चाळीसगाव, जि.जळगाव : चालू हंगामात अळ्यांच्या प्रादुर्भावीने मका पिकाचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे पाच टक्केदेखील पीक शेतकऱ्यांच्या हाती लागणार नाही. म्हणून मका उत्पादक शेतकºयांना एकरी एक लाख रुपये भरपाई शासनाने द्यावी, अशी मागणी शेतकºयांनी केली आहे.याबाबतचे निवेदन प्रशासनाला देण्यात आले आहे. त्यात म्हटले आहे की, दलाच्या टीमने याबाबत सर्वे केला असता ही बाब लक्षात आली. अळ्यांच्या आक्रमणामुळे एरवी सात-आठ फूट उंच वाढणारा मका तीन फूटसुद्धा वाढलेला नाही. ३० ते ४० क्विंटल मका पीक घेणारा शेतकरी यंदा पाच क्विंटल मकादेखील घेऊ शकणार नाही. औषध फवारणी करूनही अळ्या आटोक्यात येत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. आधीच कर्जबाजारी असणारा शेतकरी भयभीत झाला आहे. दुर्दैवाने शासनाचे याकडे लक्ष नाही. शासनाने तत्काळ सर्वे करून त्या शेतकºयांना नुकसानभरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे.या वेळी बंजारा क्रांती दलाचे अध्यक्ष राकेश जाधव, संदीप राठोड, राहुल राठोड, राजेंद्र जाधव, संतोष चव्हाण, शुभम राठोड, सुभाष राठोड, विलास जाधव, कैलास राठोड, संजय जाधव आदी उपस्थित होते.
चाळीसगावात अळ्याच्या प्रादुर्भावाने मका पिकाची वाढ खुंटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2019 4:30 PM
चाळीसगाव , जि.जळगाव : चालू हंगामात अळ्यांच्या प्रादुर्भावीने मका पिकाचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे पाच टक्केदेखील पीक ...
ठळक मुद्देशेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणीनिवेदन प्रशासनाला