नांदेड, ता. धरणगाव : रात्री-अपरात्री होणारी चोरटी अवैध वाळू वाहूतक रोखण्यासाठी गिरणा व अंजनी नदीपात्रातील व पात्रालगतचे सर्व चोर रस्ते मंडल अधिकारी गणेश बिऱ्हाडे यांनी बंद केल्यामुळे अवैध चोरट्या वाळू वाहतुकीस आळा बसणार आहे.
नारणे, बाभूळगाव व पळसोदलगतच्या गिरणा व अंजनी नदीपात्रांमधून रात्री-अपरात्री ट्रॅक्टरांद्वारे मोठ्या प्रमाणावर वाळूची अवैध चोरटी वाहतूक केली जात होती. तहसीलदार नितीनकुमार देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ अधिकारी गणेश बिऱ्हाडे, नारणे तलाठी रोशनी मोरे, बाभुळगाव तलाठी आरिफ शेख, सरपंच व पोलीस पाटील बाभूळगाव यांनी पोकलॅन मशीनच्या सहाय्याने गिरणा व अंजनी नदीपात्रालगतच्या सर्व चोर रस्त्यांमध्ये ठिकठिकाणी मोठमोठाले लांबलचक व खोल चर खोदून सर्व चोररस्ते बंद केल्यामुळे अवैध चोरट्या वाळू वाहतुकीस आळा बसणार आहे.
तसेच रात्रीच्यावेळी होणाऱ्या चोरट्या वाळू वाहतुकीस आळा घालण्यासाठी तहसील कार्यालयामार्फत गस्तीपथक तयार करण्यात आले आहे.
===Photopath===
270521\27jal_8_27052021_12.jpg
===Caption===
पोकलॅण्ड मशिनच्या मदतीने गिरणा व अंजनीपात्रातील चोररस्ते बंद करताना मंडळ अधिकारी गणेश बिऱ्हाडे, तलाठी वर्ग, सरपंच व पोलीस पाटील.