भुसावळ : तालुक्यातील वराडसीम व कुºहे (पानाचे) येथील शेतकऱ्यांना पाझर तलावात गेलेल्या जमिनीचा मोबदला देण्यात यावा, असा न्यायालयाचा आदेश असतानाही जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे टाळाटाळ करीत होते. त्यामुळे दोन्ही गावातील शेतकºयांनी मुंबई येथे मंत्रालयात जलसंधारण विभागाचे मुख्य सचिव एकनाथ डवले यांची भेट घेतली व त्यांच्या दालनातून सहाव्या मजल्यावरून शेतकºयांनी उडी घेऊन आत्महत्या करणार असल्याची माहिती मंत्रालयातील पोलिसांना अगोदरच असल्यामुळे त्यांनी दोन्ही शेतकºयांना मंत्रालयाच्या गेटवरच आत्महत्या करण्यापासून रोखले व जलसंधारण विभागाचे मुख्य सचिव ढवले यांच्याशी भेट करून दिली.त्यामुळे डवले हे अधिकाºयांवर चांगलं संतप्त होऊन जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी दिवेकर यांच्याशी संपर्क साधून या शेतकºयांना १० दिवसात मोबदला देण्यात यावा, असा आदेश दिला.कुºहे (पानाचे)-वराडसीम या रस्त्यावर १९९२ साली पाझर तलाव बांधण्यात आला आहे. यावेळी या तलावात कुºहे (पानाचे) येथील गयाबाई तोताराम बारी, जनार्दन बारी व शांताराम शंकर कोळी तसेच वराडसीम येथील अजित पिंजारी, वत्सलाबाई ओंकार नारखेडे, अरुण चौधरी, गणी पिंजारी, लुकमान पिंजारी या शेतकºयांची जमीन संपादित करण्यात आली आहे. मात्र त्यावेळी या शेतकºयांना अतिशय तोकडी रक्कम देण्यात आली होती. त्यामुळे या शेतकºयांनी १९९८/९९ साली न्यायालयात धाव घेतली. याचा निकाल २०१३ साली लागून संबंधित शेतकºयांना ५१ लाख रुपये देण्याचे आदेश देण्यात आले होते.
जळगावच्या प्रकल्पग्रस्तांना मंत्रालयात आत्महत्येपासून रोखले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2018 10:52 PM
शेतकºयांना मंत्रालयाच्या गेटवरच आत्महत्या करण्यापासून रोखले व जलसंधारण विभागाचे मुख्य सचिव ढवले यांच्याशी भेट करून दिली.
ठळक मुद्देपाझर तलावात गेलेल्या जमिनीचा मोबदला देण्यास टाळाटाळआत्महत्येची पोलिसांना आधीच मिळाली होती खबरपोलिसांनी घालून दिली मुख्य सचिवांची भेट