सणवारामुळे जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाल्यांची आवक कमी झाल्याने बटाटे, वांगे यांचे भाव वधारण्यासह कोथिंबीरच्या भावात दीडपटीने वाढ झाली. गेल्या आठवड्यात २००० ते ३००० रुपये प्रती क्विंटल असलेल्या कोथिंबीरचे भाव या आठवड्यात ३००० ते ४००० रुपये प्रती क्विंटलवर पोहोचले. हरतालिका, गणेशोत्सवामुळे शेतकऱ्यांनी शेतातून माल काढला नसल्याने आवक कमी झाली. त्यामुळे गंगाफळ, गवारच्या शेंगा, कोथिंबीर, मेथीची आवक घटून त्यांचे भाव वाढत आहे. बटाट्याच्याही भावात २०० रुपयांनी वाढ होऊन ते ११०० ते १५०० रुपयांवरून १३०० ते १५०० रुपये प्रती क्विंटल झाले आहे. लिंबूच्याही भावात वाढ होऊन ते १५०० ते २००० रुपये प्रती क्विंटलवरून २५०० रुपयांवर पोहचले आहे. गणेशोत्सवात भंडाºयासाठी गंगाफळ व इतर भाज्यांना मागणी वाढणार आहे.
जळगावात वांग्याचे दर वाढले
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2018 5:41 AM