भरीताच्या वांग्यांचे दर आले आवाक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2020 6:44 PM
भालोद, बामणोद, आमोदा येथील वांग्यांना मागणी
भालोद, ता. यावल : येथील तसेच बामणोद व आमोदा येथील प्रसिद्ध असलेल्या भरीताच्या वांग्याना दिवसेंदिवस मागणी वाढत आहे. संपूर्ण खान्देशात भालोद, बामणोद व आमोदा येथील भरीताच्या वांग्यांना मोठी मागणी असते. या वांग्याचा मोठ्या चवीने खवैय्ये आस्वाद घेतात. खास लांबून लांबून येथे येऊन नागरिक भरीताच्या वांग्यांची खरेदी करीत असतात.सुरुवातील अधिक भाव असलेले वांग्यांचे भाव आता आवाक्यात आले आहेत. सुरुवातीस दिवाळीच्या दिवसांमध्ये या वांग्यांचा भाव शंभर रुपये प्रति किलो असा होता, मात्र सध्या वांग्याची आवक वाढल्याने ३०ते ४० रुपये प्रति किलो अशा दराने चांगल्या लसलशीत वांगे मिळत आहेत. ग्रामीण भागात शेतात ठीक ठिकाणी भरीत पार्ट्यांची रंगत वाढत आहे या वांग्यांना काट्यांवर ती व काड्यान वरती भाजून व त्यामध्ये जाड मिरची भाजून लसुन अद्रक ठेचले जाते तसेच कोशिंबीर व नंतर त्याला तेलामध्ये तळले जाते त्यासोबत कळण्याची भाकर पुरी मोठ्या चवीने खाल्ली जाते खानदेशातील या भागातील भारताचे वांगे लसलशीत असल्याने त्यांना भाजल्यानंतर त्यामधून सुद्धा तेल पडत असते यामुळे या भरताची चवच भारी लागत असल्याने या साठी मुंबई नाशिक पुणे औरंगाबाद अहमदाबाद नागपूर याठिकाणी नोकरीनिमित्त गेलेले नागरिक दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये या भारताचा आस्वाद घेत असतात सध्या भरीत पार्ट्यांची चांगलीच रंगत वाढलेली दिसून येत आहे