शहरं
Join us  
Trending Stories
1
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
2
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
3
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
4
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
5
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
6
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
7
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
8
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
9
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
10
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
11
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
12
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
13
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
14
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योगगुरूंनीच सांगितलं...
15
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
16
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
17
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
18
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
19
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
20
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!

शेतमालाला भाव मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 04, 2020 9:01 PM

अवहेलना । कासोदा कृषी उत्पन्न बाजार समितीत माल घेण्यास नकार

कासोदा, ता.एरंडोल : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्याच्या शेतमालाला पुरेसा भाव मिळत नसल्याची तक्रार शेतकरी बांधवांंनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष व सचिव यांच्याकडे केली आहे.सूत्रांनुसार, खडके खुर्दचे शेतकरी विलास गुलाब पाटील हे सफेद ज्वारी घेऊन बाजार समितीत गेले. त्यांच्या मालाचा लिलाव करण्यासाठी कोणीही व्यापारी यायला तयार होत नव्हते. संबधित शेतकºयाने विनंती करूनदेखील ते माल घेण्यासाठी तयार होत नव्हते. तेव्हा शेतकºयाने बाजार समितीच्या संचालकांशी संपर्क साधला. त्यांनी कासोदा येथील व्यवस्थापकाला फोन केला. तेव्हा व्यापारी जयप्रकाश समदाणी आले. परंतु त्यांनी माझ्याकडे माणसं नाहीत व माल ठेवायला जागा नाही, अशी उत्तरे देऊन माल घेण्यास नकार दिला. त्यानंतर दिलीप मंत्री यांनी सफेद ज्वारी घेण्यास नकार देऊन ज्वारी काळी असती तर घेतली असते, असे सांगून मालाची खिल्ली उडवली. काळ्या ज्वारीला मार्केट आहे, असेही त्यांनी बोलून दाखविले. पावसाचा फटका बसलेली काळी ज्वारी त्यांना कमी भावाने मिळते व नफा जास्त मिळतो म्हणून काळी ज्वारीला पसंती दिली जाते व चांगला माल नाकारला जातो, असे सर्वच मालाच्या बाबतीत घडते. अनेक तक्रारी करूनदेखील कासोदा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, सचिव, संचालक यांनाही व्यापारी दाद देत नाही. याकडे संबंधित अधिकारी व लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावे, अशी शेतकरी बांधवांची व्यथा आहे.