विजयकुमार सैतवालजळगाव : खरेदी केंद्रांवर हरभऱ्याची मोठ्या प्रमाणात खरेदी झाल्यानंतर तो माल सरकार बाहेर काढत नसल्याने व शेतकºयांकडील माल बाजारात येणे बंद झाल्याने हरभºयाची आवक कमी होऊन हरभºयाच्या भावात ९०० ते १००० रुपयांनी वाढ झाली आहे. या सोबतच हरभरा डाळीच्या भावात देखील १४०० रुपये प्रती क्विंटलने वाढ झाली आहे.आयात बंदयंदा सरकारने शासकीय खरेदी केंद्रावर हरभरा मोठ्या प्रमाणात खरेदी केला. हा माल सध्या सरकारने शासकीय गोदामांमध्ये ठेवला असून तो बाजारपेठ अथवा दालमिलसाठी उपलब्ध होऊ शकत नसल्याचे चित्र आहे. त्यात आता शेतकºयांकडचाही माल येणे बंद झाला आहे. या सर्वांमध्ये शेतकºयांच्या मालाला भाव मिळावा म्हणून सरकारने विदेशातून आयात होणाºया मालावर बंदी घातली आहे. त्यामुळे बाजारात हरभºयाची आवक कमी झाली आहे.हमी भावापर्यंत हरभरा नेण्याचा प्रयत्नआयात बंदी केल्याने शेतकºयांच्या मालाला भाव मिळण्याची अपेक्षा असून त्यानुसार हळूहळू भाव वाढ होत आहे. त्यात सरकारने हमी भावात वाढ केल्याने हरभºयाचा भाव वाढीव हमीभावापर्यंत आणण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. त्यामुळे सरकारने खरेदी केलेला मालदेखील बाहेर काढला जात नसल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.भावात मोठी वाढमध्यंतरी हरभºयाची आवक वाढल्याने हरभरा ३००० रुपये प्रती क्विंटलपर्यंत खाली आला होता. मात्र त्यानंतर त्यात हळूहळू वाढ होऊन तो ३४०० ते ३५०० रुपयांवर आला. त्यानंतर आता आवक कमी झाल्याने आठवडाभरात हरभºयाच्या भावात थेट ९०० ते एक हजार रुपयांनी वाढ होऊन तो ४३०० ते ४५०० रुपये प्रती क्विंटलवर पोहचला. कच्च्या मालाचे भाव वाढल्याने हरभरा डाळीच्याही भावात मोठी वाढ झाली आहे. गेल्या आठवड्यात ४००० ते ४४०० रुपये प्रती क्ंिवटल असलेली डाळ आज ५४०० ते ५८०० रुपये प्रती क्विंटलवर पोहचली आहे.सट्टा बाजारामुळे वाढएकतर शेतकºयांकडे माल नाही, त्यात जो माल होता तो सरकराने खरेदी केला आहे आणि तो गोदामात आहे. त्यामुळे हरभरा बाजारात आणणे अथवा न आणणे तसेच त्याची भाववाढ हे सर्व गणित सट्टाबाजारात ठरविले जात असल्याने हरभºयावरील या सट्ट्याने त्याचे भाव वाढत असल्याचेदेखील सांगितले जात आहे.हरभºयाची आयात बंद असण्यासह शेतकºयांच्या मालाला भाव मिळण्यासाठी शासकीय गोदामातील हरभराही बाजारात येत नसल्याने आवक कमी होऊन हरभºयासह डाळीच्याही भावात वाढ झाली आहे.- प्रेम कोगटा, अध्यक्ष, जळगाव दालमिल ओनर्स असोसिएशन.सरकारने खरेदी केलेला माल गोदामात असल्याने हरभºयाची आवक कमी झाली आहे. हा माल बाजारात आल्यास आवक सुधारून भाव स्थिर राहू शकतात.- शशी बियाणी, व्यापारी, कृषी उत्पन्न बाजार समिती.उत्पादीत माल सरकारी गोदामात असल्याने व शेतकºयांकडील माल येणे बंद असल्याने हरभºयासह डाळीच्या भावात वाढ झाली आहे.- प्रवीण पगारिया, अध्यक्ष, दाणाबाजार असोसिएशन.
हरभरा डाळीचे भाव १४०० रुपयांनी वधारले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2018 11:30 AM
आयात बंद
ठळक मुद्देहमी भावापर्यंत हरभरा नेण्याचा प्रयत्नसट्टा बाजारामुळे वाढ