शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांमधील तफावतीबाबत 'लोकमत'च्या बातमीवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
2
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
4
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
5
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
6
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
7
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
8
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
9
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
10
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
11
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
12
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
13
विद्यार्थ्यांच्या नोंदणीसाठी शिक्षकांचे 'अपार' कष्ट; २५ टक्के नोंदणी अपूर्ण
14
शेती आणि शेतकरी - यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतून दोघेही हद्दपार!
15
‘कॉर्पोरेट’ प्रचार, फतवे अन् व्हायरल इंडिया; निवडणुकीचा प्रचार झालाय हाय-टेक
16
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

हरभरा डाळीेचे भाव ८०० रुपयांनी गडगडले; ग्राहकांना दिलासा, शेतकरी हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2018 12:05 PM

प्रचंड आवक

ठळक मुद्देमागणी वाढली तरी भाववाढ ऐवजी घसरणहरभरा खरेदी बंदचाही परिणाम नाही

विजयकुमार सैतवाल / आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. १५ - हरभऱ्याचे उत्पादन वाढण्यासह दोन वर्षांपासून माल शिल्लक असल्याने बाजारपेठेत हरभरा डाळीचीही आवक वाढून डाळीच्या भावात ७०० ते ८०० रुपये प्रतिक्विंटलने घसरण झाली आहे. यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला असला तरी शेतकºयांच्या मालाला भाव मिळत नसल्याने ते हवालदिल झाले आहेत. यंदा मागणी वाढली तरी डाळीमध्ये भाववाढ होण्याऐवजी घसरण झाल्याचे चित्र प्रथमच दिसून येत असल्याचे व्यापाºयांचे म्हणणे आहे. दरम्यान, जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हरभरा खरेदी बंद असली तरी जिल्ह्यातील इतर भागातून माल येत असल्याने दालमिलमध्ये कच्च्या मालावर कोणताही परिणाम झाला नसल्याचे चित्र आहे.रब्बी हंगाम संपून बाजारपेठेत हरभरा येत आहे. यंदा हरभºयाची मोठ्या प्रमाणात लागवड होऊन उत्पादन साधारण २५ ते ३० टक्क्याने वाढले आहे. त्यामुळे सध्या बाजारपेठेत हरभºयाची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यात भरात भर म्हणजे दोन वर्षापासूनचा माल शेतकरी, व्यापारी, दालमिल येथे शिल्लक असल्याने सर्वत्र हरभºयाचा बफर स्टॉक असल्याचेच चित्र आहे.डाळींचीही आवक वाढलीहरभºयाचे उत्पादन चांगले असल्याने दालमिलमध्ये पुरेसा कच्चा माल उपलब्ध होत आहे. डाळ उत्पादन अग्रेसर असलेल्या जळगावातील दालमिलमध्ये जिल्ह्यातील व्यापाºयांकडून मोठ्या प्रमाणात माल येत आहे. यामुळे डाळींचे उत्पादन वाढले आहे. या सोबतच विदर्भातील मलकापूर, अकोला, अमरावती तर मध्यप्रदेशातील इंदूर, खंडवा येथून तयार डाळही जळगाव बाजारपेठेत येत आहे.भाव गडगडलेआवक वाढल्याने डाळीचे भाव ७०० ते ८०० रुपये प्रति क्विंटलने कमी झाले आहेत. आठ ते दहा दिवसांपूर्वी ५४०० ते ६००० रुपये प्रति क्विंटल असलेली हरभरा डाळीचे भाव आज ४७०० ते ५२०० रुपयांवर आले आहेत.मागणीही वाढलीसध्या धान्य खरेदीचा हंगाम सुरू असून या सोबत डाळीचीही खरेदी केली जात आहे. यामध्ये हरभरा डाळीला चांगलीच मागणी आहे. असे असले तरी भाव वाढण्याऐवजी ते कमी झाल्याचे चित्र यंदा बाजारपेठेत आहे.व्यापाºयांची द्विधा स्थितीहरभºयाच्या बाबतीत शेतकºयांच्या पदरी निराशा असून त्यांच्या मालाला भाव नाही. यासोबतच व्यापाºयांचीही द्विधा स्थिती निर्माण झाली आहे. हमी भावात माल घेतला तर त्या तुलनेत बाजारपेठेत भाव मिळत नाही तर दुसरीकडे कमी भावाने माल खरेदी केला तर कारवाईची भीती आहे, त्यामुळे व्यापारीदेखील संकाटत सापडले आहेत.हरभºयाची आवक चांगली असून डाळ उत्पादनही यंदा चांगले आहे. यामुळे डाळीचे भाव कमी झाले आहेत. जळगाव जिल्ह्यातून ठिकठिकाणाहून हरभºयाची आवक होत आहे.- प्रेम कोगटा, अध्यक्ष, जळगाव दालमिल ओनर्स असोसिएशन.हरभºयाचे उत्पादन वाढल्याने यंदा आवक चांगली असण्यासह बाजारपेठेत तयार डाळीचीही आवक वाढली आहे. यामुळे हरभरा डाळीच्या भावात घसरण झाली आहे. डाळीला मागणीही चांगली आहे.- प्रवीण पगारिया, अध्यक्ष, ग्रेन किराणा मर्चंट असोसिएशन.यंदा हरभरा डाळीचे भाव मोठ्या प्रमाणात कमी झाले असून इतके कमी भाव अनेक वर्षांत पाहिलेले नाही.- अनिक कांकरिया, उपाध्यक्ष, जळगाव जिल्हा व्यापारी महामंडळ.

टॅग्स :MarketबाजारJalgaonजळगाव