शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; एकनाथ शिंदे उद्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार
2
IPL Auction 2025: काव्या मारनची 'स्मार्ट' खेळी! जयदेव उनाडकटने रचला मोठा इतिहास; केला अनोखा विक्रम
3
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
4
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
5
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
6
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
7
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...
8
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
9
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी
10
निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले...
11
ऑफिसात डुलकी घेतली, म्हणून कंपनीनं नोकरीवरून काढलं; 'त्यांनी' असा बदला घेतला की, सर्वांनाच चकित केलं!
12
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
13
IPL Auction 2025 : एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या MI च्या गोलंदाजाला CSK नं केलं 'करोडपती'  
14
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...
15
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
16
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
17
IPL Auction 2025: MS Dhoni चा 'भिडू' Mumbai Indians ने पळवला; दीपक चहरसाठी मोजले किती कोटी? जाणून घ्या
18
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
19
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
20
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 

डाळींच्या भाववाढीस ‘ब्रेक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2018 12:04 PM

मागणी कमी झाल्याने आठवडाभरात ३०० ते ४०० रुपयांनी घसरण

ठळक मुद्देग्राहकांना दिलासामागणी झाली कमी

विजयकुमार सैतवालजळगाव : गेल्या तीन आठवड्यांपासून सतत भाववाढ होत असलेल्या डाळींच्या भावात या आठवड्यात ३०० ते ४०० रुपये प्रती क्विंटलने घट झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. बाजारपेठेत आवक कमी असली तरी मागणी कमी झाल्याने डाळींच्या भाववाढीस ‘ब्रेक’ लागला असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.यंदा कमी पावसामुळे खरीप हंगामावर मोठा परिणाम झाला असून उत्पादन घटसह दर्जावरही परिणाम झाला आहे. त्यात डाळींसाठी महत्त्वाचा घटक असलेल्या उडीद, मुगाला ऐन पाण्याची आवश्यकता असतानाच पावसाने दडी मारल्याने त्यांचे उत्पादन कमी होऊन कडधान्याची आवक घटली व गेल्या तीन आठवड्यांपासून डाळींच्या भावामध्ये दर आठवड्याला तेजी येत होती.मागणी झाली कमीबाजारात एक तर आवक कमी व मागणी जास्त असल्याने सर्वच डाळींचे भाव वाढत गेले. तीन आठवड्यात भाव वाढ होत जाऊन उडीदाची डाळ ६९०० रुपये प्रती क्विंटल पोहचली होती. तसेच हरभरा डाळ ६६०० रुपये प्रती क्विंटल, तूरडाळ ७००० रुपये प्रती क्विंटलवर पोहचली होती. मात्र सलग भाववाढीमुळे या आठवड्यात मागणी तब्बल ३० ते ४० टक्क्यांनी घटली आहे. त्यामुळे उडीदाच्या डाळीचे भाव ६००० ते ६४०० रुपये प्रती क्विंटलवर आले आहेत. अशाच प्रकारे ६६०० रुपये प्रती असलेल्या हरभरा डाळीचे भाव ६००० ते ६४०० रुपये प्रती क्विंटलवर आले आहेत. तर तूरडाळ ७००० रुपये प्रती क्विंटलवरून ६००० ते ६८०० रुपये प्रती क्विंटलवर आली आहेत. मुगाची डाळ मात्र ७५०० ते ८००० रुपये प्रती क्विंटलवर स्थिर आहे.आवक नसताना भावात घसरणतसे पाहता नवीन उडीद-मूग आल्यानंतर या दिवसात नवीन डाळींचीही आवक होते. त्यामुळे जळगावातील दालमिलमधून मोठ्या प्रमाणात डाळी निर्यातही होतात. मात्र यंदा आवकच कमी असल्याने डाळींचे उत्पादनही २५ ते ३० टक्क्यांनी कमी झाले आहे. असे चित्र असताना भावात घसरण झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. उन्हाळ््यासोबतच या दिवसातही डाळींची मोठ्या प्रमाणात खरेदी होते. मात्र भाववाढीमुळे या खरेदीच्या हंगामातच यंदा मागणी घटल्याचे चित्र आहे.चार आठवड्यापूर्वीचे भावडाळींमध्ये मोठी भाववाढ होण्यापूर्वी २२ आॅक्टोबर रोजी हरभरा डाळ ५५०० रुपये प्रती क्लिंटल होती. तसेच तूर डाळ ६००० रुपये प्रती क्लिंटल, उडीद डाळ ५२०० रुपये प्रती क्लिंटल व मुगाची डाळ ७५०० रुपये प्रती क्लिंटल होती. त्यात सलग तीन आठवडे भाववाढ होत गेली. चौथ्या आठवड्यात भाववाढ थांबली असली तरी सध्याचे भाव चार आठवड्यांपूर्वीच्या भावापेक्षा जास्तच आहे.गेल्या तीन आठवड्यांपासून डाळींच्या भावात मोठी भाववाढ झाली होती. मात्र याच भाववाढीमुळे ग्राहकांनी खरेदी थांबविल्याने डाळींची मागणी कमी झाली व त्यांचे भाव घसरले आहे.- प्रवीण पगारिया, अध्यक्ष, दाणाबाजार असोसिएशन, जळगाव. 

टॅग्स :MarketबाजारJalgaonजळगाव