अच्युतराव अत्रे इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये गुणवंतांचा गौरव करण्यात आला. नरेश अशोक कोळी हा ९८ टक्के गुणांसह शाळेतून पहिला आला. तर शांभवी देशमुख, हिमाक्षी पाटील, श्रुती सोनार, दक्ष घुगे यांनीही यश मिळवले. गुणवंतांचे मुख्याध्यापिका प्रीती झारे, कांचन शेटे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
ला.ना. विद्यालय
शि.प्र. मंडळ संचालित शेठ ला.ना. सार्वजनिक विद्यालयाने १०० टक्के यश मिळवले. करण भावसार हा शाळेतून पहिला आला. तर मयूर वाघ, केयूर अत्रे, आदित्य सुरळकर, पीयूष बडगुजर, हितेश नारखेडे, रितेश फडके, मनोज चव्हाण यांनीही यश मिळवले. गंधे सभागृहात कार्याध्यक्ष सुशील अत्रे, पंकज अत्रे, रसिका अत्रे, दुर्गादास मोरे, भारती गोडबोले विद्यार्थ्यांचा सत्कार केला. सूत्रसंचालन सविता दातार यांनी केले, तर आभार सुरेश कुलकर्णी यांनी मानले.
महात्मा गांधी विद्यालय
भादली, ता. जळगाव येथील महात्मा गांधी विद्यालयात भूमिका चौधरी हिने ९५.२० टक्के गुण मिळवले. तर तनुजा चौधरी ९०.६० टक्के, धनंजय सोनवणे ९० टक्के, चैताली कुंभार, होमेश ढाके यांनीही यश मिळवले. विद्यार्थ्यांचे कौतुक गोविंद महाजन, मधुकर नारखेडे, सचिव सुनील नारखेडे, राजेंद्र कोल्हे, मुख्याध्यापक डी.के. धनगर यांनी केले.
इकरा शाहिन उर्दू हायस्कूल
इकरा शाहिन उर्दू हायस्कूल मेहरुणमध्ये ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यात इफराह नाज शेख हारुन ९९.६० टक्के, अरीबा शेख ९९.४० टक्के, अलफीया फातेमा शेख रोशन ९७.४० टक्के, मोहम्मद शाह ९७.२० टक्के, सैयद जुहा फातेमा अली अंजुम ९६.८० टक्के, मसिरा खानम नुर मोहम्मद खान ९६ टक्के, तहुरा तस्लीम पटेल ९४.८० टक्के, समरिन शाह ९४.२० टक्के, तहरिन शाह ९४ टक्के, बरिरा शेख ९३.२० टक्के, शेख अफ्फान ९२.४० टक्के, अलफिया शेख आफरीन पटेल, आमीर पिरजादे, मोहम्मद उमर शाह यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ. करीम सालार, सचिव एजाज पटेल, चेअरमन डॉ. मोहम्मद ताहेर, मुख्याध्यापक शेख गुलाब, शेख जाकीर, आतीक अहमद खान उपस्थित होते.