महिला अधिकारी म्हणून ग्रामीण भागात अतिशय कौतुकाने पाहिले जाते. प्रथम नियुक्ती तहसीलदारपदी झाली तेथील अनुभव आजदेखील आठवणीत आहेत. खान्देशात महिला अधिकारी वर्गास मोठा मान दिला जातो. विविध कामानिमित्त महिला ज्यावेळी भेट देण्यासाठी येतात त्यावेळी महिला अधिकाऱ्यांना आपले म्हणणे त्यांना अधिक मोकळेपणाने मांडता येते असा अनुभव आहे.विविध कामानिमित्त यावेळी ग्रामीण भागात फिरण्याचा योग येतो त्यावेळी तेथील मुली, महिला यांना देखील आपल्यामधील एक जण अधिकारी आहे व आपण देखील असे पद मिळवू शकू अशी प्रेरणा मिळते. त्यांना विविध बाबी समजून दिल्या की त्या मुली, महिलांच चेहेऱ्यावर एक समाधानाचे वातावरण दिसते. आपणाशी संपर्क साधला, चर्चा केली यावरही या मुली, महिला समाधानी दिसतात. यातच कामाचे समाधान आम्हाला मिळते. कुणाची समस्या आपल्या प्रयत्नांनी दूर झाली तर त्यातही मोठे समाधान लाभते.केला जातो. यानिमित्ताने विविध क्षेत्रातील चांगले काम करणाºया महिलांचा गौरव केला जातो. तसेच सर्व क्षेत्रात महिला आघाडीवर कशा प्रकारे पुढे गेलेल्या आहेत याची आकडेवारी प्रसिद्ध होते. तथापि आपल्या अवतीभोवती वावरणाºया सर्वसामान्य महिलांचे देखील यानिमित्ताने कौतुक व्हावे. स्वत:च्या पायावर उभे राहून व्यवसाय करणाºया व आपल्या कुटुंबाच्या उत्पन्नात मोठा हातभार असणाºया भाजी विक्रेत्या, मोलकरणी, छोटे-मोठे घरगुती उद्योग करणाºया भगिनी अथवा शेतात मजुरी करणाºया बायका या देखील कौतुकास पात्र आहेत. आपणास चांगले शिक्षण घेता आले नाही तरी आपल्या मुलांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी झिजणाºया कामगार वर्गातील महिला सक्षम झाल्या पाहिजे.- शुभांगी रवींद्र भारदे,उपजिल्हाधिकारी पुनर्वसन, जळगाव.
महिला अधिकारी म्हणून ग्रामीण भागात कौतुक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2019 11:49 AM