यावेळी आमदार अनिल पाटील, माजी आमदार साहेबराव पाटील, डॉ.बी. एस. पाटील यांनी डॉ. ज्योती राणे या प्रताप महाविद्यालयाच्या इतिहासातील एक सुवर्ण कामगिरी करणाऱ्या कर्तृत्वसंपन्न आदर्श प्रशासक होत्या. संस्थाचालकांच्या शाबासकीपेक्षा त्यांचा समाजाने केलेला गौरव लाखपट मोठा आहे, असे सांगितले.
यावेळी माजी आमदार स्मिता वाघ, महिला मंचच्या डॉ.अपर्णा मुठे, नागरी समितीचे संदीप घोरपडे, बन्सीलाल भागवत यांनीही मनोगत व्यक्त केले.
प्रास्ताविक प्रा.अशोक पवार यांनी केले. प्रा.नितीन पाटील यांनी परिचय करून दिला. उद्योगपती सुहास राणे यांनी डॉ. ज्योती राणे यांनी उत्कृष्टपणे घर व कुटुंब सांभाळून नेत्रदीपक प्रगती केल्याचे सांगितले. प्रा.लीलाधर पाटील यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष विनोद पाटील, बाजार समितीच्या प्रशासक तिलोत्तमा पाटील, डॉ. अनिल शिंदे, सुभाष चौधरी, रणजित शिंदे, अभिजित भांडारकर, मकसूद बोहरी, विवेक देशमुख, मंगलसिंग सूर्यवंशी, प्रवीण जैन, पारोळा येथील माजी नगराध्यक्ष सुरेंद्र बोहरा, कमल कोचर, डॉ. निखिल बहुगुणे उपस्थित होते.