भुसावळ, जि.जळगाव : शहरातील इंदिरानगर भागात पत्त्याच्या जुगारावर छापा टाकून पोलिसांनी आठ संशयितांना अटक केली आहे, तर ३१ हजार ५० रुपये व जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले आहे . ही कारवाई २७ रोजी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास करण्यात आली आहे. बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आरिफखान तायर खान रा.दीनदयाल नगर, आरिफ शेख हमीद शेख रा.दीनदयाल नगर, गणेश श्यामराव वाढवाणे रा. सिंधी कॉलनी , युसुफ इमाम गवळी रा.शिवपूर-कन्हाळा रोड, मोबीन शेख अब्दुल रफिक आगवाली चाळ, जावेद छब्बू तडवी रा. मिल्लत नगर, शेख आरिफ शेख रज्जाक रा. मोहम्मदी नगर, अखिल असलम रा. जाम मोहल्ला अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. या कारवाईत ३१ हजार ४४५० रुपये व जुगारांचे साहित्य हस्तगत करण्यात आले आहे.ही कारवाई डीवायएसपी गजानन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक देवीदास पवार, पोलीस उपनिरीक्षक मनोज ठाकरे, सहाय्यक फौजदार अंबादास पाथरवट, पो. हे. कॉ. सुनील जोशी, शंकर पाटील, पो. कॉ.कुलकर्णी, संकेत झांबरे, विकास सातदिवे, भूषण लाड, विशाल सपकाळे, अविनाश पाटील, भूषण चौधरी, बंटी कापडणे आदींनी केला आहे. तपास पो.कॉ.सुनील जोशी करीत आहे.
भुसावळ येथे जुगारावर छापा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2018 3:48 PM
भुसावळ , जि.जळगाव : शहरातील इंदिरानगर भागात पत्त्याच्या जुगारावर छापा टाकून पोलिसांनी आठ संशयितांना अटक केली आहे, तर ३१ ...
ठळक मुद्देपोलिसांनी पाच जणांना केली अटक३१ हजार रुपयांचा ऐवज हस्तगत