भुसावळ : तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीत हातभट्टीचे तीन अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले. यात तीन आरोपींना अटक केली तर तब्बल २६ हजार ७०० रुपयांचा माल ताब्यात घेण्यात आला आहे. संचारबंदीत हातभट्टीची दारू सुरू असल्याची माहिती पोलिसांना कळल्यानंतर ही कारवाई केली.बेलव्हाळ येथे वाघूर नदी पात्रांच्या कडेला साहेबराव उत्तम सोनवणे याच्या हातभट्टीवर छापा टाकण्यात आला. त्यात कच्चे रसायनचे ३ ड्रम आणि ७० लिटर तयार दारू असा सुमारे २१ हजार ३०० चा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे. सूनसगाव येथील लीलाधर वसंत कोळी याच्या कडे छापा टाकून ३० लिटर तयार दारू असा२ हजार ७०० रुपये किमतीचा माल मिळून आला. तर साकेगाव येथील भिका शांताराम कोळी याच्यावर सिंगार बर्डी भागात छापा टाकण्यात आला. यात ३० लिटर दारू२ हजार ७०० किमतीची मिळून आली.कुºहे येथील चौघांवर गुन्हाकुºहे पानाचे येथील संचारबंदीत काम नसतानाही फिरत असल्यामुळे बाळकृष्ण शिवराम कोळी, रमेश कैलास बारी, समाधान रामचंद्र बिजागरे , गोविंद भिल यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पो. नि. रामकृष्ण कुंभार , सहा. पो .नि .अमोल पवार , पो. हे .कॉ .युनूस शेख , विठ्ठल फुसे , राजेंद्र पवार, विजय पोहेकर, प्रेमचंद सपकाळे, शिवाजी खंडाळे , सुनील चौधरी यांनी केली आहे.
तीन हात भट्टयांवर छापा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2020 2:06 PM