लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव : शेतक-यांनी केवळ शेतीवर अवलंबून न राहता आधुनिकतेची कास धरत जोडधंद्यांना प्राधान्य द्यावे असे आवाहन जि.प.उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन यांनी बुधवारी आदर्श शेतकरी पुरस्काराप्रसंगी केले.जिल्हा परिषदेच्या छत्रपती शाहू महाराज सभागृहात आदर्श कृषी पुरस्कार वितरण करण्यात आले. यात कृषी विभागातर्फे जिल्ह्यातील १५ शेतकºयांना ५१०० रुपयांचा धनादेश, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. अध्यक्षस्थानी जि.प.अध्यक्षा उज्ज्वला पाटील होत्या. तर उपाध्यक्ष तथा कृषी समिती सभापती नंदकिशोर महाजन यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षण सभापती पोपटतात्या भोळे, समाज कल्याण सभापती प्रभाकर सोनवणे, आरोग्य सभापती दिलीप पाटील, महिला व बालकल्याण सभापती रजनी चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी दिवेकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मस्कर हे उपस्थित होते. शिवाजी दिवेकर यांनी शेतकºयांनी गटशेतीकडे वळण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. त्यातून वाहतुक, लागवड, मजुरीसह खतांच्या खर्चातही बचत होऊन उत्पादन वाढीस हातभार लागतो. तसेच नुकसान झाल्यास त्याचा फारसा आर्थिक फटका देखील बसत नाही. त्यामुळे गटशेती हा एक चांगला पर्याय असल्याचे त्यांनी सांगितले. सुत्रसंचालन आरोही नेवे यांनी केले. प्रास्तविक व आभार कृषि विकास अधिकारी मधुकर चौधरी यांनी केले.या शेतकºयांचा झाला गौरवयावेळी एरंडोल तालुक्यात दापोरी येथील ईश्वरलाल पाटील, भडगाव तालुक्यातील आमडदे येथील संजय भोसले, पारोळ्यातील टिटवी येथील संजय पाटील, भुसावळ तालुक्यातील साकरीतील नारायण पाचपांडे, बोदवड तालुक्यातील वाकी येथील कैलास पाटील, चाळीसगाव तालुक्यातील बहाळ येथील सोपान महाजन, अमळनेर तालुक्यातील दहिवद खु.येथील हिरालाल पाटील, चोपडा तालुक्यातील वाळकी येथील मधुकर धनगर, धरणगाव तालुक्यातील साकरे येथील जयदिप पाटील, करंज येथील अनिल सपकाळे, जामनेर येथील अनुप जहागिरदार, मुक्ताईनगरातील सुकळी येथील विरेंद्र पाटील, पाचोरा तालुक्यात परधाडे येथील नरेंद्र पाटील, रावेर तालुक्यात तांदलवाडी येथील कन्हैया महाजन, यावल तालुक्यात सावखेडासिम येथील भगवान पाटील यांचा गौरव करण्यात आला.
शेतीसोबत जोडधंद्यांना प्राधान्य द्या : नंदकिशोर महाजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2018 7:44 PM
१५ शेतकऱ्यांचा जिल्हा परिषदेतर्फे सन्मान
ठळक मुद्देगटशेती हा एक चांगला पर्यायजिल्ह्यातील १५ शेतकºयांना ५१०० रुपयांचा धनादेश, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. शेतक-यांनी केवळ शेतीवर अवलंबून न राहता आधुनिकतेची कास धरत जोडधंद्यांना प्राधान्य द्यावे