जळगाव - चारचाकी वाहनासाठी माहेरून पाच लाख रुपये आणण्यासाठी विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी न्यायालयाने बुधवारी वरणगाव येथील पतीसह चौघांना सहा महिने साधी कैद व प्रत्येकी दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. तसेच एकाची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता झाली आहे.वैशाली अश्विनकुमार वाघ असे यातील पीडितेचे, तर पती अश्विनकुमार गौतम वाघ, सासू उषादेवी गौतम वाघ, मनीषा भीमराव बिºहाडे व भीमराव दिगंबर बिºहाडे अशी शिक्षा झालेल्यांची नावे आहेत. २६ डिसेंबर २०१२ नंतर काही दिवस वैशालीचा शारीरिक, मानसिक छळ झाला होता. याचा गुन्हा नोंदवण्यात आला़ पोलिसांनी तपासानंतर याचे आरोपपत्र दाखल केले़ मात्र पुराव्यांअभावी यातून रूपेश गौतम वाघ याची निर्दोष मुक्तता करण्यात आली.न्या. जी.जी. कांबळे यांच्या न्यायालयात हा खटला चालला. त्यात न्यायालयाने सहा साक्षीदार तपासले. फिर्यादी वैशाली, भाऊ तसेच तपासी अंमलदार कैलास विश्वनाथ मारुमर्दाने यांच्या साक्ष महत्त्वपूर्ण ठरल्या.
पत्नीला छळणाऱ्या पतीसह चौघांना तुरुंगवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2018 4:17 AM