आॅनलाईन लोकमतजळगाव दि,७ : जिल्हा कारागृहात उपोषणाचे हत्यार उपसणाºया १८ बंदीजनांना बुधवारी पोलीस बंदोबस्तात औरंगाबाद येथील कारागृहात हलविण्यात आले. भुसावळ येथील न्यायालयाच्या आदेशाने या बंदीजनांना औरंगाबादला पाठविण्यात आल्याची माहिती कारागृहाचे प्रभारी अधीक्षक विलास साबळे यांनी दिली. दरम्यान, या बंदीजनांनी उपोषण सुरु केल्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांनी बुधवारी कारागृहात भेट देवून माहिती जाणून घेतली. कोरेगाव भीमा दंगल प्रकरणात भुसावळात झालेल्या आंदोलनात १८ जणांविरुध्द बाजारपेठ पोलीस स्टेशनला कलम ३०७ चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा मागे घ्यावा व कोरेगाव भीमा दंगल प्रकरणी संभाजी भिडे व मिलिंद एकबोटे यांना अटक करावी या मागणीसाठी जिल्हा कारागृहात असलेल्या भुसावळच्या १८ कैद्यांनी सोमवारपासून आमरण उपोषण पुकारले होते.त्याची माहिती कारागृह प्रशासनाने न्यायालयाला दिली होती.वैद्यकीय सुविधा नाहीतकारागृहात वैद्यकिय सुविधा किंवा डॉक्टर नाहीत. त्यामुळे उपोषणात एखाद्या बंदीजनाची तब्येत खालावली तर ऐनवेळी वैद्यकिय सुविधा उपलब्ध होऊ शकत नाही. खबरदारीचा उपाय म्हणून या सर्व बंदीजनांना औरंगाबाद येथे हलविण्यात आले. त्यासाठी पोलीस मुख्यालयातून अतिरिक्त बंदोबस्त घेण्यात आला. दरम्यान, बंदीजन व कारागृह प्रशासनाने उपोषणाची मााहिती न्यायालय, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, मानवाधिकार आयोग, कारागृह प्रशासन यांना उपोषणाची नोटीस दिली आहे.
जळगावात कारागृहातील ‘त्या’ बंदीजनांना औरंगाबादला हलविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2018 12:00 AM
जिल्हा कारागृहात उपोषणाचे हत्यार उपसणाºया १८ बंदीजनांना बुधवारी पोलीस बंदोबस्तात औरंगाबाद येथील कारागृहात हलविण्यात आले. भुसावळ येथील न्यायालयाच्या आदेशाने या बंदीजनांना औरंगाबादला पाठविण्यात आल्याची माहिती कारागृहाचे प्रभारी अधीक्षक विलास साबळे यांनी दिली. दरम्यान, या बंदीजनांनी उपोषण सुरु केल्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांनी बुधवारी कारागृहात भेट देवून माहिती जाणून घेतली.
ठळक मुद्देन्यायालयाचे आदेशपोलीस अधीक्षकांनीही दिली भेट वैद्यकिय सुविधा नाहीत