जळगाव : स्वत:वर दाखल गुन्हे व घरगुती कारणांमुळे मानसिक तणावात असलेल्या निशांत तेजकुमार कोल्हे (२१, रा़ रामानंदनगर) या कैद्याने स्वत:च्या गळ्यासह हातावर तीक्ष्ण हत्याराने वार करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार जिल्हा कारागृहात शुक्रवारी सायंकाळी ५ वाजता घडला़ जखमी कैद्यावर जिल्हा रूग्णालयात उपचार केल्यानंतर त्याची पुन्हा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे़सायबर गुन्ह्यात झाली अटकसूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, निशांत कोल्हे याच्याविरूध्द सायबर पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे़ यात त्यास अटक करण्यात आली असून तो २२ एप्रिल २०१९ पासून तो कारागृहात आहे.मात्र, गेल्या काही दिवसांपासून तो त्याच्यावर दाखल असलेल्या गुन्हे व घरगुती कारणामुळे मानसिक तणावात होता़तसेच जामिनासाठी कॅश सिक्युरिटीही नाही़ अखेर शुक्रवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास त्याने एका तीक्ष्ण हत्याराने स्वत:च्या हातावर दोन तर गळ्यावर दोन वार करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला़ या अचानक झालेल्या घटनेमुळे कारागृहातील कैदी आणि पोलिसांमध्ये एकच धावपळ उडाली होती.त्वरित नेले रूग्णालयातस्वत:वर वार केल्यामुळे निशांत हा गंभीर जखमी झाला़ हा प्रकार कारागृहातील पोलिसांना कळताच त्यांनी त्वरित त्यास जिल्हा रूग्णालयात नेले़ त्यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ़ प्रवीण पाटील यांनी त्याच्यावर उपचार केले़ निशांत याच्या उजव्या आणि डाव्या बाजूला तसेच गळ्याला दुखापत होऊन रक्तस्त्राव होत होता़ नंतर सायंकाळी ६ वाजता उपचारानंतर निशांत यास पुन्हा कारागृहात नेण्यात आले़ त्याच्याजवळ तीक्ष्ण वस्तू कोठून आली, हा सुध्दा प्रश्न उपस्थित केला जात होता़कारागृहात क्षमतेपेक्षा कैदीकारागृहात क्षमतेपेक्षा अधिक कैद्यांचा भरणा असल्याने लहान मोठे वाद उद्भवने ही नित्याचीच बाब झाली आहे. गेल्या दहा महिन्यांपासून प्रभारी अधीक्षकाचा पदभार अनिल वांधेकर यांच्याकडे आहे. कारागृहात १८० पुरुष आणि १४ महिलांची क्षमता असताना याठिकाणी ४३७ पुरुष कैदी आणि ३१ महिला आहेत, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे़
स्वत:वर वार करून कैद्याचा आत्महत्त्येचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2019 12:08 PM