जळगाव : गांधी रिसर्च फाउंडेशन व मराठी विज्ञान परिषद, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय नवप्रवर्तन स्पर्धेचा पारितोषिक वितरण कार्यक्रम २८ रोजी दुपारी चार वाजता ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ व गांधी रिसर्च फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर हे राहणार आहेत. डॉ. विपिनकुमार, गुजरात विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. सुदर्शन अयंगार, अणुवैज्ञानिक प्रोफेसर जे. बी. जोशी, मराठी विज्ञान परिषदेचे मानद सचिव ए. पी. देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
कोरोनासारख्या आव्हानात्मक काळातदेखील या स्पर्धेत इयत्ता पाचवी ते दहावीच्या एक हजार ९५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या पारितोषिक वितरण कार्यक्रमात ऑनलाइन पद्धतीने सहभागी व्हावे, असे आवाहन गांधी रिसर्च फाउंडेशन व मराठी विज्ञान परिषदेतर्फे करण्यात आले आहे.