भुसावळ : सध्याच्या काळात कुटुंबातील सदस्यांनीही एकत्र येणे काळाची गरज आहे. उत्सवकाळात घरातील गणपतीसमोरील सजावटीच्या निमित्ताने हे सदस्य एकत्र येतात. त्यामुळे मुलांवरही चांगले संस्कार होतात, असे मत आमदार संजय सावकारे यांनी व्यक्त केले.
येथील रोटरी क्लब ऑफ रेल सिटीतर्फे आयोजित स्व. प्रसन्न देव स्मृती गणेशोत्सव घरगुती सजावट स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभप्रसंगी ते बोलत होते. रोटरीचे सहायक प्रांतपाल डॉ. गोविंद मंत्री, शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे डॉ. मकरंद नारखेडे, रेल सिटीचे अध्यक्ष हरविंदरसिंग ठेठी, सचिव आशिष अग्रवाल, प्रोजेक्ट चेअरमन श्रीकांत जोशी व्यासपीठावर उपस्थित होते.
या वेळी उत्सवकाळात सामाजिक उपक्रम राबविल्याबद्दल अंतर्नाद प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदीप पाटील, सामाजिक पर्यावरण व प्रदूषण मंडळाचे जिल्हाध्यक्ष नाना पाटील यांचा विशेष पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. स्पर्धेतील विजेते पुढीलप्रमाणे :
गट क्र. १ : प्रथम - अनुष्का दीपेश सोनार, द्वितीय - डॉ. मृणाल चेतन पाटील, तृतीय - रजनी संजय सावकारे.
गट क्रमांक दोन : प्रथम - विशाल अरुण पोतदार, द्वितीय- पंकज शांताराम नेवे, तृतीय- किरण म. सोहळे.
सर्व विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते आकर्षक स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आले. संदीप जोशी यांनी सूत्रसंचालन केले. प्रोजेक्ट चेअरमन श्रीकांत जोशी यांनी प्रास्ताविक, तर प्रोजेक्ट को-चेअरमन संदीप सुरवाडे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. अध्यक्ष हरविंदरसिंग ठेठी यांनी आभार मानले.