वरणगाव, जि. जळगाव : वरणगाव शिवारातील मन्यारखेडा गावाजवळ केळीच्या बागेत पाच वर्षाच्या नर जातीच्या बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी एकला घडली. घटनास्थळी बकरीच्या मांसाच्या तुकड्यातून विषजन्य पदार्थाचा वास येत असल्याने बिबट्याच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त करण्यात येत आहे.घटना संशयास्पदशेती गट क्रमांक ६९२ मधील केळीच्या बागेत बिबट्या मृतावस्थेत सापडला. थोड्या अंतरावर बकरीच्या मांसाचे दोन जागी तुकडे वनविभागाच्या कर्मचाऱ्यांसह अधिकाºयांना आढळले. तसेच जवळच्या झाडाजवळ बिबट्याने उलटी केल्याचे आढळून आल्याने विषप्रयोगाचा प्रकार तर नाही ना, असा वनविभागाच्या कर्मचाºयांचा संशय बळावला. याबाबतची माहिती वरिष्ठ अधिकाºयांना दिल्यानंतर सहायक वनसंरक्षक दशहरे घटनास्थळी दाखल होऊन परिस्थितीची पाहणी केली असता तेथील स्थिती संशयास्पद आढळली. बकरीच्या मांसाच्या तुकड्यातून विषजन्य पदार्थाचा वास येत असल्याने ते मासाचे तुकडेही वनविभागाने ताब्यात घेतले.शवविच्छेदन सोमवारीबिबट्याचा मृत्यू संशयास्पद ठरल्याने जागेवरच शवविच्छेदन करण्यासाठी आलेले पशुधन विकास अधिकारी डॉ.सलीम तडवी यांना सोमवारी तज्ज्ञ अधिकाºयांच्या उपस्थितीत शवविच्छेदन करण्याचे ठरले. यामुळे बिबट्याच्या मृतदेह मुक्ताईनगरला वनविभागाच्या नर्सरीत हलविण्यात आला.वनपाल दीपाश्री जाधव, मुकेश बोरसे यांनी पंचनामा केला. यावेळी स्थानिक पोलिसांसह वनविभागाचे कर्मचारी उपस्थित होते.बघ्यांची गर्दीबिबट्याला पाहण्यासाठी आजूबाजूच्या गावातील नागरिकांनी गर्दी केली होती.परिसरात बिबट्याचे वास्तव्यविल्हाळे, जाडगाव, मन्यारखेड परिसरात बिबट्याचे वास्तव्य आहे. या आधी वेल्हाळे शिवारात लाकूड फाटा गोळा करणाºया इसमावरही बिबट्याने हल्ला चढवित गंभीर जखमी केले होते. तसेच वेल्हाळे गावाशेजारील गुरांंच्या गोठ्यावर बिबट्याने हल्ला चढवित अनेक गुरे तसेच कुत्रे फस्त केल्याचे अनेक वेळा आढळले आहे. तसेच ऊसाच्या शेतातून बिबट्याचे बछडे आढळून आले असल्याने या क्षेत्रात बिबट्याचे वास्तव असल्याचे स्पष्ट होते.तीन महिन्यांपूर्वी कोºहाळा शिवारात वाघाचा शॉक लागून मृत्यू झाला होता. त्याआधी सुकळी शिवारात एका वाघिणीचा भुकेमुळे मृत्यू झाला होता, तर डोलारखेडा शिवारात हरणाचे २२ शिंग सापडले होते.
जळगाव जिल्ह्यात बिबट्याचा संशयास्पद मृत्यू, विष प्रयोगाची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 03, 2019 10:09 PM