भुसावळ : शहरासह राज्य कार्यक्षेत्र असलेल्या अडचणीतील 26 पतसंस्थांवर जिल्हा उपनिबंधकांच्या आदेशान्वये 26 वसुली अधिका:यांची नियुक्ती करण्यात आली आह़े शासनाच्या या निर्णयामुळे ठेवीदारांना मोठा दिलासा मिळाला आह़ेदरम्यान, हक्काच्या रकमेसाठी ठेवीदार वंचित ठरत असल्याने अधिका:यांच्या नियुक्तीनंतर त्यांना रक्कम मिळण्याची आशा आह़ेविविध पतसंस्थांवर नियुक्त अधिका:यांना कलम 156 चे अधिकार बहाल करण्यात आल्याने ते रक्कमेच्या वसुलीसह जप्ती व लिलाव प्रक्रिया राबवण्यात असल्याचे सूत्रांनी सांगितल़े अडचणीतील पतसंस्था अशासहकार मित्र श्री चंद्रकांत हरी बढे सर अर्बन को़ऑप क्रेडीट सोसा़लि़, वरणगाव, श्री विठ्ठल रखुमाई अर्बन को़ऑप क्रेडीट सोसायटी लि़, भुसावळ, धनवर्धिनी नागरी सहकारी पतसंस्था लि़वरणगाव, ता़भुसावळ, सप्तश्रृंगीमाता अर्बन को़ऑप क्रेडीट सोसायटी लि़, भुसावळ, जय माता दी अर्बन को़ऑप क्रेडीट सोसायटी लि़, भुसावळ, महात्मा फुले अर्बन को़ऑप क्रेडीट सोसायटी लि़, वरणगाव, मंगला शारदा अर्बन को़ऑप क्रेडीट सोसायटी लि़, भुसावळ, स्वामी नारायण अर्बन को़ऑप क्रेडीट सोसायटी लि़, भुसावळ, संतोषीमाता र्मचट अर्बन को़ऑप क्रेडीट सोसायटी लि़, भुसावळ, महाकालेश्वर अर्बन को़ऑप क्रेडीट सोसायटी लि़, भुसावळ, सहकारी पतसंस्था दर्यापूर, ता़भुसावळ, संत ज्ञानेश्वर अर्बन को़ऑप क्रेडीट सोसायटी लि़, भुसावळ, जनता अर्बन को़ऑप क्रेडीट सोसायटी लि़, भुसावळ, चक्रधर र्मचट अर्बन को़ऑप क्रेडीट सोसायटी लि़, भुसावळ, साईबाबा अर्बन को़ऑप क्रेडीट सोसायटी लि़, भुसावळ, ओम अर्बन को़ऑप क्रेडीट सोसायटी लि़, भुसावळ, श्री काळा हनुमान अर्बन को़ऑप क्रेडीट सोसायटी लि़, भुसावळ, आनंद अर्बन को़ऑप क्रेडीट सोसायटी लि़, भुसावळ, मनुदेवी अर्बन को़ऑप क्रेडीट सोसायटी लि़, भुसावळ, सरदार वल्लभभाई अर्बन को़ऑप क्रेडीट सोसायटी लि़, भुसावळ, सदगुरु अर्बन को़ऑप क्रेडीट सोसायटी लि़, भुसावळ, पी़ई़तात्या अर्बन को़ऑप क्रेडीट सोसायटी लि़, भुसावळ, एकनाथराव खडसे अर्बन को़ऑप क्रेडीट सोसायटी लि़, भुसावळ, गुरुदेव ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या़, भुसावळ, कस्तुरी अर्बन को़ऑप क्रेडीट सोसायटी लि़, भुसावळ, बालाजी अर्बन को़ऑप क्रेडीट सोसायटी लि़, भुसावऴकष्टाने पै अन् पै जमवून पतसंस्थेत ठेवलेल्या ठेवीदारांना हक्काच्या रकमेसाठी वर्षानुवर्षे पतसंस्थांचे उंबरठे ङिाजवावे लागत आह़े पतसंस्था चालकांच्या भ्रष्ट प्रवृत्तीमुळे हक्काच्या ठेवींपासून ठेवीदार वंचित आहेत़ शासनाने उशिरा का होईना ठेवीदारांच्या तक्रारींची दखल घेतली आह़े अडचणीतील पतसंस्थांवर नियुक्त 26 अधिकारी मार्चर्पयत नियुक्त असून त्यानंतर पुढील कालावधी निश्चित केला जाणार आह़े जप्तीसह लिलावाचे अधिकार4अडचणीतील पतसंस्थांवर नियुक्त करण्यात आलेल्या वसुली अधिका:यांना कजर्दारांच्या मालमत्ता जप्त करण्यासह लिलावाचे अधिकार कलम 156 प्रमाणे देण्यात आले आहेत शिवाय ते थकीत कर्जाच्या रक्कमा वसुल करणार आहेत़4ज्या पतसंस्थांनी 101 ची प्रकरणे दाखल केली नाहीत त्यांनी तातडीने दाखल करावीत, असे आवाहन सहकार विभागाने आह़े शासनाकडील बिलव्याजी दोनशे कोटींचे पॅकेज घेतलेल्या पतसंस्थांकडूनही वसुली करण्यात येणार आह़े
अडचणीतील 26 पतसंस्था रडारवर
By admin | Published: February 06, 2017 1:09 AM