अमळनेर, जि.जळगाव : अखिल भारतीय ग्राहक पंचायतीतर्फे १ रोजी वीज ग्राहकांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा घेण्यात आली. अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे तालुकाध्यक्ष मकसूद बोहरी अध्यक्षस्थानी होते. महावितरणचे धरणगाव विभागाचे कार्यकारी अभियंता रमेश पवार यांच्या उपस्थितीत ही कार्यशाळा झाली. यात तालुक्यातील वीज ग्राहकांनी आपल्या वीज समस्या मांडल्या. यावर समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध असल्याचे कार्यकारी अभियंता पवार यांनी सांगितले.याप्रसंगी व्यासपीठावर सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीश गुलाबराव पाटील, अमळनेर एमआयडीसीचे चेअरमन जगदीश चौधरी, अमळनेर महावितरणचे अभियंता कोलते, देशमुख, फुरसिंगे आदी मान्यवर उपस्थित होते.याप्रसंगी माजी आमदार साहेबराव पाटील, कामगार नेते रामभाऊ संदानशिव यांनी धावती भेट देऊन ग्राहक पंचायतीच्या या उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांना आदरांजली वाहण्यात आली.वीज कंपनीत उल्लेखनीय सेवा करणाऱ्या वीज कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यात श्याम पाटील, रवींद्र पाटील, योगेश पाटील, ज्ञानेश्वर बडगुजर, विनायक भालेराव, लक्ष्मण सांगोरे, भागवत माने व हंसा कुर्वे, संध्या जाधव यांचा समावेश आहे.वीज ग्राहकांना मार्गदर्शन करताना पवार यानी आरएफ मीटर हे किती बिनचूक आहे याची माहिती दिली. वीज कंपनीतर्फे देण्यात येणाºया सुविधा, नवीन उपक्रमांची माहिती देण्यात आली. ग्राहकांच्या आलेल्या लेखी समस्यांना उत्तरे देऊन कारवाई करण्याचे आश्वासन अधिकाºयांनी दिले.यावेळी संघटनेचे तालुका संघटक राजेंद्र सुतार, सहसंघटक बापू चौधरी, सहसचिव योगेश पाने, महिला आघाडीप्रमुख अॅड.भारती अग्रवाल, करुणा सोनार, लता दुसाने तसेच कार्यकारी सदस्य सतीश मुंडके, ताहा बुकवाला, जयंतलाल वानखेडे, अनिल घासकडबी, खदिर सादिक, सुरेश पाटील, जितेंद्र चंद्रात्रे, मधुकरराव सोनार, चंद्रकांत लोहार, गणेश चव्हाण आदी कार्यकर्ते उपस्थित होते. याप्रसंगी महावितरण अमळनेर विभागाचे लेखाधिकारी अनिल ठाकूर, पालिकेचे अभियंता प्रशांत ठाकूर यांचा मकसूद बोहरी यांनी सत्कार केला. सूत्रसंचालन तालुका संघटक राजेंद्र सुतार यांनी, प्रास्ताविक सचिव विजय शुक्ल, पाहुण्यांचा परिचय ऊर्जामित्र सुनील वाघ यांनी करून दिला.
अमळनेरात वीज ग्राहकांनी मांडल्या समस्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 02, 2019 2:40 PM
अखिल भारतीय ग्राहक पंचायतीतर्फे १ रोजी वीज ग्राहकांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा घेण्यात आली.
ठळक मुद्देअमळनेरात कार्यशाळा समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध- कार्यकारी अभियंता रमेश पवारवीज कंपनीत उल्लेखनीय सेवा करणाऱ्या वीज कर्मचाऱ्यांचा सत्कारआरएफ मीटर हे बिनचूकग्राहकांच्या आलेल्या लेखी समस्यांना उत्तरे देऊन कारवाई करण्याचे आश्वासन