जळगाव- अभ्यासक्रम महाविद्यालयाच्या संकेतस्थळावर अपलोड करावे..विद्यार्थ्यांसाठी शुध्द पाण्याची व्यवस्था करण्यात यावी..स्वच्छतागृहात सॅनेटरी पॅड्स टाकण्याची व्यवस्था असावी यासह इतर मागण्यांसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्यावतीने शुक्रवारी सकाळी ११ वाजता मू.जे. महाविद्यालयाच्या प्राचार्य कार्यालयाजवळ धरणे आंदोलन करण्यात आले. विशेष म्हणजे, अभाविपच्या शिष्टमंडळाने समस्या मांडण्यापेक्षा त्या प्रत्यक्ष प्राचार्यांना दाखवून विद्यार्थ्यांच्या अडचणी सांगितले. त्यामुळे येत्या आठवडाभरात संघटनेच्या सर्व मागण्या पूर्ण होतील, असे आश्वासन प्राचार्य डॉ़ उदय कुळकर्णी यांनी दिले आहे.दहा ते पंधरा दिवसांपूर्वी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून मू.जे. महाविद्यालयाच्या प्राचार्यांना विद्यार्थ्यांना उद्भवणाऱ्या समस्यांबाबत निवेदन देण्यात आले होते. मात्र, महाविद्यालय प्रशासनाकडून निवेदनाची कुठलीही दखल घेतली नसल्यामुळे अखेर शुक्रवारी अभाविपतर्फे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उदय कुळकर्णी यांच्या कार्यालयासमोर सकाळी ११ वाजता धरणे आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन प्रदेशसह मंत्री सिध्देश्वर लटपटे व नगरमंत्री अश्विन सुरवाडे यांच्या नेतृत्वाखाली केले गेले.समस्यांच्याठिकाणी प्राचार्यांची पाहणीअभाविपच्या शिष्टमंडळाकडून प्राचार्य उदय कुळकर्णी यांची भेट घेण्यात आली. समस्यांचे कथन करून कुठलीही दखल घेतली जात नाही. म्हणून शिष्टमंडळाने प्राचार्यांना प्रत्यक्ष ज्याठिकाणी समस्या आहेत. त्याठिकाणी नेले. त्यावेळी शुध्द पाणी नसल्याचे दिसून आले तर महाविद्यालयाच्या वर्ग खोलींजवळ मोकाट कुत्रे फिरताना दिसले तर ग्रंथालयातील बंद संगणकही प्राचार्यांना दिसून आले.आठवडाभरात होणार समस्यांचे निरासनप्राचार्य डॉ़ उदय कुळकर्णी यांनी विद्यार्थ्यांच्या समस्या प्रत्यक्ष पाहून अभाविपच्या शिष्टमंडळाकडून करण्यात आलेल्या मागण्या आठवडाभरात पूर्ण करण्यात येईल, असे आश्वासन दिले. तसेच संघटनेकडून प्राचार्यांची विविध विषयांवर चर्चा करण्यात आली़ तसेच मागणीचे निवेदन देण्यात आले. यावेळी निवेदन देताना प्रदेश सहमंत्री सिद्धेश्वर लटपटे,नगर मंत्री अश्विन सुरवाडे, जिल्हा संयोजक रिद्धी वाडिकर, नगर विद्यार्थिनी प्रमुख वर्षा उपाध्ये, महाविद्यालय अध्यक्ष रितेश चौधरी, स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय अध्यक्ष मयूर अलकारी, कुणाल कोळी, कृष्णा बारी, अभिषेक पाटील, हेमांगी पाटील, करण माळकर, मयूर अलकारी, कुणाल बावस्कर आदींची उपस्थिती होती.खुर्ची छोडो आराम करो..अभाविपच्या शिष्टमंडळाने महाविद्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळून घोषणाबाजीला सुरूवात केली. प्राचार्य साहेब एक काम करो, खुर्ची छोडो आराम करो...या प्रशासनाचं करायचं काय, खाली डोकं वरती पाय या घोषणांनी महाविद्यालय परिसर दणाणून सोडले होते.या आहेत मागण्यामहाविद्यालयाच्या संकेतस्थळावर अभ्यासक्रम अपलोड करावे, ओळखपत्र नसल्यामुळे विद्यार्थ्यांना पुस्तक मिळत नसून त्वरित ओळखपत्र द्यावे, विद्यार्थ्यांसाठी शुध्द पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, महाविद्यालयात मोकाट कुत्र्यांचे प्रमाण वाढले असून मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात यावा, गं्रथालयातील बंद संगणकांची दुरूस्ती करण्यात यावी, महाविद्यालयात कचरा कुंडी ठेवण्याची व्यवस्था करण्यात यावी, अशा मागण्या अभाविष शिष्टमंडळाकडून करण्यात आली आहे. तर या मागण्या आठवडाभरात पूर्ण करण्याचे आश्वासन मू.जे. महाविद्यालयात प्राचार्यांनी दिले आहे़
प्राचार्यांना सोबत घेवून प्रत्यक्ष दाखविल्या विद्यार्थ्यांच्या समस्या !!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2019 2:34 PM