भडगाव : जन्माला आल्यानंतर ङोळे उघडून जग पाहिलेही नव्हते तेव्हापासून तब्वल १५ वर्ष प्रामाणिक आणि सर्व परिवाराचा आवङता गब्बर या श्वानाचा अचानक मृत्यू झाल्याने घरातील सदस्य हरपल्याचे जाणवू लागत येथीन सोनार परिवारावर जणू दु:खाचा डोंगरच कोसळला. कुटुंबातील सदस्य बनलेल्या जीवाभावाच्या ‘गब्बर’ या श्वानावर विधीवत अंत्यसंस्कार करीत वसंत एकनाथ सोनार यांच्या परिवाराने गब्बरचा दशक्रीया विधी करून गावकऱ्यांना जेवणही दिले.या गब्बर नामक श्वानोचे परिवारावर प्रेम आणि प्रामाणिकपणा यावरुन ‘तेरी मेहरबानीया, तेरी कदर दानीया, कुर्बान तुझपे मेरी जिंदगानीया’ या तेरी मेहरबानीया चित्रपटातील भावनिक गीताची आठवण सारे काही सांगून जाते.वाङे येथील वसंत एकनाथ सोनार यांच्या शेतकरी कुटुंबाने १५ वर्षापूर्वी श्वानाचे छोटे पिलू पाळले. या पिलाने ङोळेही उघङले नव्हत तेव्हापासून सोनार परिवार त्यांचा सांभाळ करीत आले. त्याचे नाव गब्बर असे ठेवण्यात आले. हाक देताच गब्बर धावत यायचा. त्यामुळे गब्बर साºया परिवाराचा आवङता बनला. खायला दिले तेवढेच तो खायचा. घराची, दुकानाची, शेताची प्रामाणिकपणे राखाणही करायचा. एकप्रकारे गब्बर हा रखवालदाराची प्रामाणिकपणे भूमिका बजावत होता. वसंत सोनार यांचे कुणी नाव जर कुणी घेतले तर हा गब्बर समोरच्या माणसावर रागाने पाहत धाव घ्यायचा. १५ वर्ष हा गब्बर या परीवाराचा सदस्याप्रमाणे भूमिका निभावत होता. परंतु या गब्बरचा मृत्यू झाला.‘गब्बर’च्या प्रतिमेची मिरवणूकवाडे येथील सोनार परिवाराने या गब्बरवर विधीवत अंत्यसंस्कार केले. त्यानंतर त्याचा दशक्रीया विधी करीत अन्नदानही केले. गब्बरच्या प्रतिमेची मिरवणूक काढून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. गब्बर याचे स्मरणार्थ गावातील व्यायामशाळेसाठी तरुणांना व्यामाचे साहित्यासाठी वसंत सोनार यांनी ५ हजार रुपये देणगी देणार असल्याचे सांगितले. अशा या आवङत्या गब्बरच्या आता केवळ आठवणी राहिल्या आहेत. तेरी मेहरबानीया या चित्रपटातील श्वानाच्या कथेप्रमाणे या गब्बरची जणू कथा बनली आहे. गावात गब्बरच्या श्रद्धांजलीचा डिजिटल फलकही लावण्यात आला आहे.
वाडे येथे ‘तेरी मेहरबानीया...’ची प्रचिती, श्वानाचा दशक्रियाविधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2019 10:23 PM