ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि.11- जी.एच.रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयातील मेकॅनिकल विभागातील अंतिम वर्षातील विद्याथ्र्यानी बहुउद्देशीय कृषी यंत्र तयार केले आहे. विशेष म्हणजे हे उपकरण एकच व्यक्ती हाताळू शकतो.
शेतीसंबधीत कामे अधिक गतीने व कमी वेळेत व्हावे या उद्देशाने हे उपकरण तयार करण्यात आले आहे. त्यात गवत कापणी, जमीनीची मशागत, खते देणे, फवारणी ही कामे या यंत्राद्वारे करता येतात. या यंत्रासाठी 30 हजार रुपये खर्च आला. त्याला मिनी रोटाव्हेटर, कटर, खत पेटी, फवारणी पंप, नळी, इंजिन बसविण्यात आले आहेत. विवेक नाईक, तेजस जैन, राहुल बेलदार, अनिशा बि:हाडे, शाहरूख शेख या विद्याथ्र्यानी हे यंत्र तयार केले आहे. पाच मजुरांचे काम एकटे यंत्र एका दिवसात करू शकते, असा दावा या विद्याथ्र्यानी केला आहे. हे एकच यंत्र चार प्रकारची कामे करते. त्यामुळे वेगवेगळे यंत्र खरेदी करून त्यांची जतन करण्याची आवश्यकता शेतक:यांना असणार नाही. या यंत्राच्या निर्मितीसाठी भूषण साळुंखे यांनी मार्गदर्शन केले. या यशाबद्दल विद्याथ्र्याचे संस्थेचे कार्यकारी संचालक प्रीतम रायसोनी, प्राचार्य डॉ.प्रभाकर भट, विभागप्रमुख प्रा.राजेश दहिभाते यांनी अभिनंदन केले.