जळगाव : संपूर्ण जग कोविड १९ सारख्या संसर्गजंन्य रोगा सोबत लढत आहे. या रोगाची लागण आपल्या शहरात पोहचू नये यासाठी डॉक्टरासह, नर्सेस, पोलीस, सफाई कामगार व आदी कोरोना फायटर्स आपले कर्तव्य बजावत आहे. या कोरोना फायटर्सची सुरक्षितता जपली जावी या हेतूने जी.एच. रायसोनी बिझनेस मॅनेजमेंट महाविद्यालयातील ई अॅण्ड टीसी विभागाकडून उपलब्ध संसाधान आणि साहित्यामधून कोरोनापासून संरक्षणासाठी तंञज्ञानाचा सहाय्याने पोर्टेबल युव्ही-सी सॅनिटायझर बॉक्सची निर्मिती करण्यात आली आहे.डॉक्टर, नर्सेस, पोलीस, सफाई कर्मचारी व आदी कोरोना फायटर्स आपल्या कामावर येतात व काम संपल्यावर घरी जातात तेव्हा त्यांच्या अंगावरील पीपीई कीट, घड्याळ, मोबाईल, व अन्य साहित्य या पोर्टेबल युव्ही-सी सॅनिटायझर बॉक्समध्ये ठेवल्यास खात्रीने ते साहित्य निजंर्तुक होणार आहे व या कोरोना फायटर्सना आपली व आपल्या कुटुंबासहित इतरांची सुरक्षा जपण्यास मदत होईल. हा बॉक्स अल्ट्रा वायोलेट किरणाचा वापर करुन बॅक्टेरिया आणि व्हायरस यासारखे सूक्ष्मजिवाणू पूर्णपणे मारतो. १०० ते २८० नॅनोमीटर, मुख्यता २५४ नोमीटरचे अल्ट्रा वायोलेट किरण हे बॅक्टेरिया आणि व्हायरस यासारखे सूक्ष्मजिवाणू पूर्णपणे मारण्यास अत्यंत उपयुक्त शस्त्र आहे. हा बॉक्स आॅर्डिनोया तंञज्ञानाचा उपयोग करुण तयार करण्यात आला आहे. यासाठी आॅर्डिनो सॉफ्टवेअर मध्ये प्लॅटफॉर्मचा उपयोग करुन प्रोग्रामिंग करण्यात आलेली आहे. आॅर्डिनो मायक्रो कंट्रोलर हा पूर्ण सॅनिटायझर बॉक्सची सॅनिटायझ करण्याची पूर्ण वेळ आणि प्रक्रिया निर्धारीत करतो. वैद्यकीय कर्मचारी आणि कोरोना योद्धा यांणि वापरलेले पोषाख आणि साहित्य यांना पूर्णपणे निर्जतूक करतो.यांनी केली बॉक्सची निर्मितीया बॉक्सचे डिझाईन आणि निमीर्ती रायसोनी अभियांत्रीकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. जी. मॅथ्यू, ईलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड टेलीकम्यूनिकेशन अभियांत्रिकी शाखेचे विभाग प्रमूख प्रा. हरिष भंगाळे व प्रा. मनोज बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली आकाश सोनवणे, शुभांगी मोरे, ज्योत्स्ना माळी आणि हर्षा वालदे या विद्यार्थ्यांनी ६२० रुपयात निमीर्ती केली आहे. सदर उपक्रमाचे रायसोनी इस्टीट्युटचे संचालक प्रितम रायसोनी, संचालिका प्रा. डॉ.प्रिती अग्रवाल तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आदींनी कौतूक केले.
पोर्टेबल युव्ही-सी सॅनिटायझर बॉक्सची निर्मिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2020 8:03 PM