शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
4
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
5
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
6
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
7
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
8
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
9
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
10
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
11
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
12
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
13
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
14
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
15
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
16
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
18
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
19
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
20
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे

भडगाव नगरपालिकेची कचऱ्यातून उत्पन्न निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 5:39 PM

भडगाव पालिकेने महिनाभर साचलेल्या सुक्या कचऱ्याची विक्री केली असून, त्यातून १६ हजार रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे, तर ओल्या कचऱ्यातून शहराच्या प्रमुख चार भागात खत निर्मिती करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देभडगाव शहरात चार ठिकाणी ओला कचरा संकलनचार बचत गटांना उपलब्ध झाले कायम रोजगार निर्मितीचे साधनओल्या कचऱ्यातून चार भागात होणार खताची निर्मिती

आॅनलाईन लोकमतभडगाव, दि. २२ : पालिकेने महिनाभर साचलेल्या सुक्या कचऱ्याची विक्री केली असून, त्यातून १६ हजार रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे, तर ओल्या कचऱ्यातून शहराच्या प्रमुख चार भागात खत निर्मिती करण्यात येणार आहे.घनकचरा व्यवस्थापन व स्वच्छ सर्वेक्षण २०१८ अंतर्गत भडगाव पालिकेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात येत आहे. येथील अग्निशामक दलाच्या प्रांगणावर सुका कचरा साठविण्या येत आहे. शहरात चार ठिकाणी ओला कचरा संकलन केले जात आहे.काही दिवसांपूर्वीच पालिकेत शहरातील बचत गटांना मुख्याधिकारी राहुल पाटील, नगराध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी मार्गदर्शन करून कचरा व्यवस्थापन करण्यास आवाहन केले होते. त्यातून आता यात सहभागी झालेल्या चार बचत गटांना कायम रोजगार निर्मितीचे साधन उपलब्ध होणार आहे.शहरातील स्वच्छता कायम राहण्यासाठी पालिकेच्या वतीने मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात येत आहे. त्यात विविध माध्यमातून प्रचार केला जात आहे. शहरात बसस्थानक, व्यापारी संकुले आदी ठिकाणांसह १५ नव्या कचरा कुंड्या लावण्यात आल्या आहेत.ओल्या कचऱ्यातून शहराच्या प्रमुख चार भागात खत निर्मिती करण्यात येणार आहे. त्यासाठी ओला कचरा एका मोठ्या तयार केलेल्या कुंड्यात साठवला जात आहे, तर मागील महिन्याभरात सुक्या कचऱ्यातून पुठ्ठा ५०२ किलो (४०१६ रुपये), प्लॅस्टिक ५९२ किलो (५९२० रुपये), गोणपाट १२८ किलो (३८४ रुपये), काच १७१ किलो (३४२ रुपये), पत्रा १८३ किलो (२१९६ रुपये), रद्दी ६०० किलो (३००० रुपये) असा एक महिन्यात २१७६ किलो वजनाचे १५ हजार ८९८ रुपये उत्पन्न मिळाले.

टॅग्स :Bhadgaon भडगावJalgaonजळगाव