जळगाव : आॅडिओ क्लिप व्हायरल झाल्याने विद्यापीठातील प्राध्यापकाचे त्याच्या विद्यार्थिनीवरील एकतर्फी प्रेम जगजाहीर झाल्यानंतर या प्रकरणात निष्पक्ष चौकशी करून समाजात योग्य तो संदेश द्यावा, अशी मागणी विद्यार्थी संघटनांकडून होत आहे़एकतर्फी प्रेम प्रकरणाचे बिंग फुटू नये, म्हणून विद्यार्थिनींना जादा गुण दिल्याची तक्रार जनसंवाद व पत्रकारिता विभागातील एका विद्यार्थ्याने विद्यापीठाच्या कुलगुरूंकडे केली आहे़सोबतच पुरावा म्हणून आॅडिओ क्लिप सादर केली आहे़ याबाबत ‘लोकमत’ने सविस्तर वृत्त प्रकाशित केले होते़ त्यामुळे या प्रकरणात निष्पक्षपणे चौकशी होऊन कारवाईची मागणी विद्यार्थी संघटनांकडून करण्यात येत आहे़तक्रार निवारण समितीलाही ‘तो’अर्ज प्राप्तकुलगुरू प्रा़ पी़पी़ पाटील यांच्याकडे विद्यार्थिनींना जादा गुण दिल्याची तक्रार जनसंवाद व पत्रकारिता विभागातील एका विद्यार्थ्याने केली आहे़ या प्रकरणाच्या चौकशीसाठी हालचाली सुरू झाली असून हीच तक्रार विद्यापीठाच्या तक्रार निवारण समितीला सुध्दा प्राप्त झाली आहे़ या प्रकरणामुळे सध्या एकच खळबळ उडाली आहे़शोध प्रबंध केले उशिरा जमातक्रारदार विद्यार्थ्याने पत्रकारिता विभागात २०१६ मध्ये प्रथम वर्षाला प्रवेश घेतला होता़ मात्र, एक वर्षाचा खंड पडल्याने त्याला शोध प्रबंध सादर करता आला नाही़ नंतर हा विद्यार्थी उत्तीर्ण सुध्दा झाला़ मात्र, प्राध्यापकाकडून विद्यार्थिनींना जादा गुण दिल्याची चर्चा ऐकल्यानंतर पुरावा मिळवून कुलगुरूंकडे या प्रकरणाची तक्रार केली.शैक्षणिक कॅम्पसमध्ये आई-वडील आपल्या पाल्यांना विश्वासाने पाठवतात़ गुरूला आई-वडिलांपेक्षा मोठं मानतो़ मात्र, त्यांनीच असे वागणे चुकीचे आहे़ या प्रकरणाची निष्पक्षपणे चौकशी व्हावी़ याप्रकरणाची समितीमार्फत चौकशी व्हावी व विद्यार्थ्यांच्या तक्रार निवारणासाठी विशेष विभाग विद्यापीठाने उभारावा़-विराज कावडीया, अध्यक्ष, युवाशक्ती फाउंडेशनजे प्रकरण घडल आहे़ ते अत्यंत वाईट आहे़ प्राध्यापक आणि विद्यार्थिनींच नातं वडील-मुलीच्या नात्याप्रमाणे असते.भविष्यात अशी घटना घडू नये, यासाठी महाविद्यालय व विद्यापीठ प्रशासनाने योग्य ती कारवाई करावी़ भविष्यात अशा घटना घडणार नाही़ याचा विचार करावा़-देवेंद्र मराठे, जिल्हाध्यक्ष, एनएसयुआय, जळगावविद्यापीठातील प्राध्यापकांची आॅडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली़ त्यातील संवाद हा अतिशय निंदनीय व अशोभनीय आहे. विद्यापीठात खान्देशातून विद्यार्थी मोठ्या अपेक्षेने शिकण्यासाठी येत असतात. अशा प्रकारचे वर्तवणुक हे प्राध्यापक करत असतील तर ते निंदनीय आहे. याबाबत चौकशी करण्यात यावी.-अॅड.रुपसिंग वसावे, आदिवासी एकता विद्यार्थी परिषदप्राध्यापक हे समाजातील प्रतिष्ठेचे व जबाबदार पद आहे़ मात्र, जर प्राध्यापक आपल्या वैयक्तिक हितासाठी काही विद्यार्थ्यांना नियमबाह्य शैक्षणिक लाभ पोहोचवून इतर विद्यार्थ्यांवर अन्याय करत असतील व त्यामुळे विद्यार्थ्यांना मनस्ताप होत असल्यास विद्यापीठाकडून योग्य ती कारवाई व्हायला हवी़-भुषण धनगर, जिल्हा अध्यक्ष़ सत्यशोधक विद्यार्थी संघटनाप्राध्यापक म्हणून विद्यार्थिनीबद्दल असा विचार करणे चुकीचे आहे़ याप्रकरणाची विद्यापीठाने निष्पक्षपणे चौकशी करून कारवाई करावी़ विद्यापीठ कॅम्पसमध्ये हा प्रकार घडणे गंभीर आहे़ या प्रकारांमुळे शैक्षणिक परिसरातील वातावरण गढूळ होते़ याप्रकरणी अभाविप शिष्टमंडळ कुलगुरूंची भेट घणार असून. चौकशी समितीत दुसऱ्या विद्यापीठातील व्यक्तीचा समोवश असावा ही मागणी सुध्दा करणार आहे़
-सिध्देश्वर लटपटे, प्रदेश सहमंत्री, अभाविप