जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या जनसंवाद आणि पत्रकारिता विभागाचे प्रमुख डॉ़ सुधीर भटकर यांच्याबद्दल विभागातीलच विद्यार्थ्याने केलेल्या तक्रारीच्या अनुषंघाने कुलगुरू प्रा़ पी़पी़पाटील यांनी तज्ज्ञांची समिती गठीत केली असून बुधवारी या समितीकडून चौकशीचे कामकाज सूरू झाले आहे़विद्यापीठातील जनसंवाद आणि पत्रकारिता विभागातील विभाग प्रमुख डॉ़ सुधीर भटकर यांनी विभागातील विद्यार्थिनींना जादा गुण दिल्याची तक्रार एका विद्यार्थ्याने नुकतीच कुलगुरूंकडे केली होती़ सोबतच या विद्यार्थ्याने त्यांच्या प्रेम संवादाची आॅडिओ क्लिप सुध्दा पुरावा म्हणून कुलगुरूंकडे सादर केली आहे़ मात्र, ही आॅडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होताच, चर्चेला उधाण आले असून विविध विद्यार्थी संघटनांकडून संबंधित प्राध्यापकाविरूध्द कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत आहे़अहवालाच्या आधारावर पुढील निर्णयकुलगुरू प्रा़ पी़पी़पाटील यांच्यासह विद्यापीठाच्या तक्रार निवारण समितीकडेही डॉ़ सुधीर भटकर यांच्याविरूध्दचा तक्रारी अर्ज प्राप्त झाला आहे़ या तक्रारीची कुलगुरू यांनी दखल घेऊन पाच ते सहा जणांची समिती गठीत केली असून या समितीकडून बुधवारपासून चौकशीचे कामकाज सुरू झाले आहे़ तसेच अत्यंत नि:पक्ष व तटस्थपणे समिती कामकाज करुन आपला अहवाल सादर करणार आहे. समितीचा हा अहवाल विद्यापीठाला प्राप्त झाल्यानंतर या अहवालाच्या आधारे विद्यापीठ पुढील निर्णय घेईल अशी माहिती कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील यांनी दिली.निष्पक्षपणे चौकशी व्हावीअखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या शिष्टमंडळाने कुलगुरू पी.पी. पाटील यांची भेट घेतली. या प्रकरणातून विद्यापीठाची बदनामी होत असून, विद्यापीठाने उच्च स्तरीय चौकशी समिती नेमून निष्पक्षपणे हे प्रकरण निकाली काढावे आणि प्रकरणातील मुख्य तक्रारदार याने केलेल्या मागणी नुसार सन २०१८-१९ एम.ए.एम.सी.जे. द्वितीय वर्षातील निकालाबाबत पण चौकशी करावी अशी मागणी केली. याप्रसंगी महानगरमंत्री रितेश चौधरी, विद्यार्थिनी प्रमुख श्रुती शर्मा, पुनम पाटील, हिमानी महाजन, पवन भोई, विराज भामरे आदी उपस्थित होते़तात्काळ निलंबित करापत्रकारिता विभाग प्रमुखांची सोशल मीडियावर आॅडिओ क्लिप व्हायरल झाली आहे़ हा प्रकार दडपण्यासाठी विद्यार्थिनींच्या गुणांमध्ये फेरफार करण्यात आली असल्याची तक्रार एका विद्यार्थ्याकडून करण्यात आली. आणि विद्यापीठाकडून समितीही नेण्यात आली आहे़ या प्रकरणाची चौकशी करून संबंधित व्यक्तीस निलंबित करण्यात यावे अशी मागणी अमळनेर येथील फार्मसी स्टूडंट कॉन्सिल आॅफ महाराष्ट्र संघटना व राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून करण्यात आली आहे़ या प्रकरणाची निष्पक्षपणे चौकशी व्हावी अन्यथा जनआंदोलन करण्यात येईल, असा इशाराही दिला. बुधवारी कुलगुरूंना निवेदन देताना संघटनेचे भूषण भदाणे, इम्रान खाटीक, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे हर्षल पाटील, विश्वास पाटील, दर्पण वाघ आदी उपस्थित होते़मनविसेतर्फे आंदोलनाचा इशाराप्रेम संवादातील प्राध्यापकास लवकरात लवकर निलंबित करावे़ या प्रकरणी आठ दिवसात कारवाई न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेतर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल, अशा इशारा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून पत्रकाद्वारे देण्यात आला आहे़ विद्यार्थिनींना वाढीव गुणांबाबत सुध्दा चौकशी करण्यात यावी व इतर विद्यार्थ्यांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणीही संघटनेचे जिल्हाध्यक्ष विनोद शिंदे, संदीप महाले, योगेश पाटील, पंकज चौधरी, बबलू कदम, रोहित महाजन यांनी केली आहे़बदनामीचे षडयंत्रप्रा़ तुकाराम दौड यांनी बनावट कागदपत्रांच्या आधारावर पत्रकारिता विभागात नोकरी मिळविली़ मात्र, राज्यपालांनी चौकशी करून त्यांचा प्रकार उघड केला आणि त्यांची नोकरी गेली़ त्यामुळेच तुकाराम दौंड यांच्यासह तक्रारदार व सात ते आठ जणांनी माझी बदनामी करण्याचे षडयंत्र रचले आहे़ या षडयंत्र रचणाऱ्यांविरूध्द लढा देऊ आणि विद्यापीठाच्या चौकशीत सगळे समोर येईलच़- प्रा़ डॉ़ सुधीर भटकर
प्राध्यापक ‘प्रेम संवाद’ प्रकरण : तज्ज्ञांच्या समितीकडून चौकशीला सुरूवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2019 1:07 PM