- कुंदन पाटील
जळगाव : महसुल विभागाने राज्यातील ७८ नायब तहसीलदार व ५८ तहसीलदारांना उपजिल्हाधिकारीपदी पदोन्नती दिली आहे. तसे आदेश गुरुवारी काढण्यात आले आहेत. त्यात जिल्ह्यातील चार अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयातील महसुल शाखेचे नायब तहसीलदार अमीत भोईटे व जळगाव तहसीलदार कार्यालयातील विशाल सोनवणे यांना तहसीलदारपदी पदोन्नती मिळाली आहे. तर जिल्हाधिकारी कार्यालयातील सुरेश थोरात आणि चोपड्याचे तहसीलदार अनील गावीत यांना उपजिल्हाधिकारी म्हणून पदोन्नती मिळाली आहे. दरम्यान, महसुल प्रशासनात उपजिल्हाधिकारी आणि तहसीलदारपदाची १० जागा रिक्त आहेत. त्यात निवासी उपजिल्हाधिकारी व जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांचा समावेश आहे.