आॅनलाईन लोकमतजळगाव, दि. २२ - महापालिकेच्या मालमत्ता कराची एकूण वसुली यंदादेखील केवळ ५२ टक्के इतकीच झाली असल्याने येत्या दोन महिन्यात वसुली वाढीचे मोठे आव्हान पालिका प्रशासनासमोर आहे. चालू मागणीसह मागील थकबाकीसाठी आता जप्ती करुन लिलावाचा मार्ग अवलंबल्याने वसुली चांगली होण्याची अपेक्षा प्रशासनाने व्यक्त केली आहे.३१ डिसेंबरनंतर आता घरपट्टी भरणाºयांना २ टक्के दंडासह रक्कम भरावी लागत आहे. यंदाची वसुली तरी प्रभावीपणे व्हावी यासाठी प्रशासनाने आता कंबर कसली आहे. जास्तीत जास्त मालमत्ताधारकांनी भरणा करवा असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. यासाठी प्रभागसमितीनिहाय रिक्षा लावून त्यातून थकबाकीदारांना भरणा करण्यासाठी आवाहन करण्यात येत आहे. महापालिकेने घरपट्टीच्या वसुलीसाठी कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. जानेवारीपासून घरपट्टी थकबाकीदारांची नळजोडणी तोडणे, थकबाकीदारांची यादी प्रसिध्द करणे, मालमत्ता जप्तीची कारवाई करणे अश्या तिन टप्यात कारवाई करण्यात येणार असल्याची माहीती प्रशासनाने दिली आहे. यापूर्वीच महापालिकेने थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्त करुन सील केल्या आहेत. त्यांचा लिलाव लवकरच करण्यात येणार आहे.अशी आहे आतापर्यंतची वसुलीमहापालिकेची २०१७-१८ या आर्थिक वर्षा$ची एकूण मागणी ७१ कोटी २२ लाख ९३ हजार १५ रुपये इतकी होती. त्यापोटी आजअखेर ३७ कोटी ५३ लाख ४८ हजार ६७४ रुपयांची वसुली झाली आहे. एकूण वसुली केवळ ५२ .५९ टक्के इतकी आहे. तर या वषार्ची मागील थकाबाकी वगळता चालू मागणी ४३ कोटी ७५ लाख ४८ हजार ९२ रुपये इतकी होती. त्यापोटी चालू मागणीची वसुली २८ कोटी २३ लाख १७ हजार ५८४ इतकी झाली आहे. चालू मागणीची ६५ .५४ टक्के वसुली आहे