जळगाव- जि. प. च्या समाजकल्याण विभागामार्फत राबविण्यात येणा:या दलितवस्ती सुधार योजनेत जिल्ह्यातील 774 गावांचे प्रस्ताव प्राप्त झाले आहे.
या गावांना निधीचे लवकरच वितरण केले जाणार आहे, अशी माहिती समाजकल्याण सभापती प्रभाकर सोनवणे यांनी पत्रकारांना दिली. 5 वषार्साठी कृती आराखडयात दलितवस्ती सुधार योजनेंतर्गत समाजकल्याण विभागाला 54 कोटी मंजूर झाले आहे. दलितवस्ती सुधार योजनेंतर्गत भुमिगत गटारी, पोहच रस्ते, समाजमंदिर, पाण्याची टाकी, सार्वजनिक शौचालयांची कामे करण्यात येतात. निधी मोठया प्रमाणात शिल्लक असल्याने समाजकल्याण सभापती सोनवणे यांनी सर्व ग्रामपंचायतींना प्रस्ताव सादर करण्याचे पत्र दिले होते. त्यानुषंगाने 774 गावांनी दलितवस्ती सुधार योजनेंतर्गत कामांसाठी प्रस्ताव सादर केले आहे.