जळगाव : आमदार सुरेश भोळे यांना अंतिम प्रस्ताव न दाखविताच पाठविला हा त्यांचा दावा चुकीचा असून मनपाच्या बांधकाम विभागाच्या अधिकाºयांनी त्यांना तो प्रस्ताव नेऊन दाखविला होता. मात्र त्यानंतर सुमारे वर्षभर निधीच प्राप्त न झाल्याने त्यातील सुमारे पावणेचार कोटीची कामे अन्य निधीतून करण्यात आली होती. त्याऐवजी नवीन कामे मनसेच्या नगरसेवकांच्या प्रभागांमध्ये या २५ कोटींच्या निधीतून प्रस्तावित केली. या निधीच्या श्रेयवादात पडण्यात आपल्याला स्वारस्य नसून शासनाकडून अधिकाधिक निधी यावा व शहरातील विकासकामे व्हावीत हाच उद्देश असल्याची भूमिका महापौर नितीन लढ्ढा यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या २५ कोटींच्या निधीसाठी मनपाकडून पाठविण्यात आलेला प्रस्ताव बाजूला सारत आमदार सुरेश भोळे यांच्या तक्रारीवरून या २५ कोटींच्या निधीतून करावयाची कामे निवडण्यासाठी शासनाने पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली चार सदस्यीय समिती नेमली आहे. तसेच ही कामे कोणामार्फत करावयाची हेदेखील ही समितीच ठरविणार आहे. विशेष म्हणजे शहरातील कामांचा विषय असताना मनपाचा एकही प्रतिनिधी या समितीवर नाही. सर्व गटनेत्यांची बैठक घेतलीमुंबईत असलेल्या महापौर नितीन लढ्ढा यांची भूमिका जाणून घेण्यासाठी संपर्क केला असता त्यांनी सांगितले की, २५ कोटींचा निधी २० जून २०१५ रोजी जळगाव दौºयावर आलेल्या मुख्यमंत्र्यांनी शहर विकासासाठी २५ कोटींचा निधी देण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार मनपातर्फे प्रस्ताव तयार करण्यात आला. त्यासाठी महापौर दालनात आमदार सुरेश भोळे यांच्यासह सर्व पक्षाच्या गटनेत्यांची बैठक आयोजित केली होती. काही नगरसेवकही उपस्थित होते. त्यात कॉलनी एरियातील कामे करण्याचाही विषय झाला होता. मात्र २५ कोटींचा निधी कॉलनीएरियातील कामांसाठी तोकडा असल्याने आधी प्रमुख रस्त्यांची कामे या निधीतून करावीत, जेणेकरून भेदभाव होणार नाही, असे ठरले होते. त्यानुसार कामे निश्चित करण्यात आली. ती यादी मनपाच्याअंतिम ठराव दाखविला नाही, हा दावा चुकीचा विशेष म्हणजे भाजपा नगरसेवकांच्या प्रभागातील कामेच अधिक होती. त्यानंतर तो प्रस्ताव पाठविला होता. त्यानंतर सुमारे वर्ष-दीड वर्ष निधी न मिळाल्याने या २५ कोटींच्या ठरावात प्रस्तावित कामांपैकी सुमारे पावणेचार कोटीची अत्यावश्यक कामे अन्य निधीतून करण्यात आली होती. त्यानंतर २०१६ मध्ये जामनेर दौºयानिमित्त जळगावात आलेल्या मुख्यमंत्र्यांनी निधी तातडीने मंजूर केल्याने मनपाने आधीचाच प्रस्ताव कायम ठेवत केवळ त्यातून झालेली पावणेचार कोटीची कामे बदलून मनसेच्या नगरसेवकांच्या प्रभागातील कामे प्रस्तावित केली.तसा ठराव महासभेत झाला होता. त्यामुळे आमदारांना अंतिम ठराव दाखविला नाही, हा दावा चुकीचा असल्याचे महापौर लढ्ढा यांनी सांगितले.
‘तो’ प्रस्ताव आमदारांना दाखविला होता
By admin | Published: March 18, 2017 12:40 AM