लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्ह्याच्या दळणवळणास चालना मिळण्यासाठी आवश्यक असलेल्या धुळे ते बोढरे राष्ट्रीय महामार्गासाठी नुकतेच १००७ कोटी रुपयांच्या कामाची निविदा प्रसिद्ध झाली. त्यामुळे विकासाला चालना मिळणार आहे. या भागातील प्रस्तावित रस्ते विकासाला निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे.
नुकतीच खासदार उन्मेश पाटील यांनी दिल्ली येथे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची रविभवन येथे भेट घेतली. त्यावेली त्यांनी धुळे बोढरे रस्त्यास मंजुरी दिल्याबद्दल प्रत्यक्ष भेटून आभार मानले आहेत.
त्यात बोढरे ते धुळे या ६७.२३१ किमीच्या कामासाठी १००७ कोटी रुपयांची निविदा निघाली आहे. त्यात चार मोठे पूल, चाळीसगाव बायपास, तीन व्हीयुपी अंडरपास, मालेगाव रोड चाळीसगाव येथे बायपास,
मेहुणबारे बायपास, शिरूड चौफुली आदी कामांचा समावेश आहे. यासाठी ३० महिन्यांची मुदत देण्यात आली आहे.
तरसोद ते फागणे काम लवकर पुर्ण करण्याची मागणी
या भेटीत खासदार उन्मेश पाटील यांनी महामार्गाचे तरसोद – फागणे ह्या रस्त्याची भीतीदायक परिस्थिती लक्षात आणून दिली व जळगाव शहरातून जाणाऱ्या रस्त्यांची कामे तातडीने मार्गी लावा.जेणेकरून नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रासाला समोर जावे लागणार नाही . या विषयी चर्चा केली असून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मतदार संघातील कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही दिली आहे. अशी माहिती खासदार उन्मेश पाटील यांनी दिली आहे.