भुसावळ : शहरातील जामनेर रोडवरील कुंटण खाण्यावर (वेश्या वस्ती) पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात 31 महिलांसह 20 ग्राहकांना अटक करण्यात आली़ या प्रकरणी रात्री उशिरार्पयत तीन मालकिण व चार दलाल व 20 ग्राहक अशा 28 आरोपींविरुद्ध रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला़दरम्यान, वेश्या वस्तीत अल्पवयीन मुलींचा वापर होत असल्याची माहिती पुण्याच्या फ्रीडम फर्मला मिळाल्यानंतर त्यांनी दिलेल्या माहितीनंतर ही कारवाई करण्यात आली़ ताब्यात घेतलेल्या महिलांमध्ये पाच अल्पवयीन मुलींचा समावेश आह़े सर्व महिलांची रात्री उशिरा महिला सुधारगृहात रवानगी करण्यात आली़अतिशय गुप्त पद्धत्तीने कारवाईअपर पोलीस अधीक्षक मोक्षदार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई कशा पद्धत्तीने करावी या संदर्भात नियोजन करण्यात आल़े शहर, बाजारपेठ व तालुका पोलिसांना पोलीस उपअधीक्षक कार्यालयात बैठक असल्याचे सांगून बोलावल्यानंतर सर्वाना वाहनात बसवल्यानंतर स्वत: नीलोत्पल यांनी त्यांना जामनेर रोडवरील वेश्या वस्तीत अत्यंत गुप्त पद्धत्तीने व कुणीही गुन्हेगार पळून जाणार नाही या पद्धत्तीने काळजी घेत कारवाईच्या सूचना केल्या़ प्रथमच अशा पद्धत्तीने धाडसी कारवाई झाल्याने सुज्ञ जनतेतून स्वागत होत आह़े दरम्यान, महिलांची रात्री उशिरा महिला सुधारगृहात रवानगी करण्यात आली तर पकडलेल्या 20 ग्राहकांना मंगळवारी न्यायालयार हजर केले जाईल़बनावट ग्राहक पाठवून केली कारवाईदीनदयाल नगरात पोलिसांतर्फे बनावट ग्राहक पाठवून आधी व्यवसाय सुरू असल्याची निश्चिती करण्यात आली तसेच सोबत तीन शासकीय पंचदेखील पाठवण्यात आल़े बनावट ग्राहकांसोबत पावडर लावलेल्या नोटा देण्यात आल्या त्यामुळे न्यायालयात खटला उभा झाल्यानंतर दोषींना शिक्षा होण्यास मदत होणार असल्याचे नीलोत्पल म्हणाल़े पुण्याच्या फ्रीडम फर्मचे सत्यजीत देसाई, आश्विन राठोड, नम्रता सावळे, सैरिना डिसुजा आदींनी तब्बल तीन आठवडाभर वेश्या वस्तीत चालणा:या व्यवसायावर नजर ठेवली़ अधिकृत खातरजमा झाल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षकांना माहिती देण्यात आली़ धडक कारवाईत यांचा सहभागही कारवाई नीलोत्पल यांच्यासह बाजारपेठ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज ठाकरे, उपनिरीक्षक नरेंद्र साबळे, आनंदसिंग पाटील, प्रदीप पाटील, बंटी सैंदाणे, दीपक जाधव, विकास सातदीवे, सुधीर विसपुते यांच्यासह आरसीपी प्लाटून तसेच 26 महिला पोलीस कर्मचा:यांनी केली़ शहर, बाजारपेठ व तालुका पोलीस ठाण्यातील कर्मचा:यांची कारवाई करण्यासाठी मदत घेण्यात आली़ पोलिसांना अखेरच्या क्षणात कारवाई कुठे कारवाई होणार याबाबत कळाल़े
वेश्या वस्तीत छापा, 20 ग्राहकांना अटक
By admin | Published: April 25, 2017 12:04 AM