या सगळ्या प्रकारामुळे अखेर भाजपच्या बारा आमदारांना एक वर्षासाठी निलंबित करण्यात आले आहे. या बारापैकी चौघे माजी कॅबिनेट मंत्री राहिले आहेत.
अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी समाजाच्या इम्पिरिकल डाटा केंद्राने तातडीने दिला पाहिजे, अशा आशयाचा ठराव मांडला होता. तसेच मराठा समाजालासुद्धा आरक्षण मिळाले पाहिजे. मराठा समाज व ओबीसी समाजाची कशी दिशाभूल भाजपचे नेते करतात हे छगन भुजबळ यांनी पत्र व तारीखसहित सविस्तर माहिती सांगत असताना, आपलं पितळ उघडे पडेल म्हणून गोंधळाला सुरुवात केली व अध्यक्षांसोबत गैरवर्तन व शिवीगाळ केली, असा प्रकार बुद्धिवादी पक्षांनी करावा, याचे आश्चर्य वाटले, असे शिवसेनेने म्हटले आहे. यावेळी जोडे मारो आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनाचे सूत्रसंचालन किरण अग्निहोत्री यांनी करून प्रस्ताविक शरद माळी यांनी केले. यावेळी जळगाव लोकसभा सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र महाजन, भरत महाजन, प्रमुख राजेंद्र ठाकरे, मोतीलाल पाटील, संजय चौधरी, ॲड. शरद माळी, शिवसेनेचे गटनेते विनय भावे, विलास महाजन, सुरेश महाजन, भागवत चौधरी, नंदू पाटील, किरण मराठे, अहमद पठाण, जितेंद्र धनगर ,अजय चव्हाण, शरद करमाळकर उपस्थित होते.
यशस्वीतेसाठी वाल्मीक पाटील, बाळू जाधव, राहुल रोकडे, गुड्डू पटेल, वसीम पिंजारी, सतीश बोरसे, कमलेश बोरसे, रवींद्र जाधव ,परमेश्वर रोकडे, किरण अग्निहोत्री, पप्पू कंखरे, करण वाघरे, पापा वाघरे, भय्या महाजन, विनोद रोकडे, गोपाल चौधरी, अरविंद चौधरी व सचिन चव्हाण यांच्या परिश्रमाने आजचे आंदोलन करण्यात आले.