आॅनलाईन लोकमतजळगाव, दि.१७ : महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या जळगाव शाखेतर्फे शिक्षकांना जुनी पेन्शन योजना सुरु करावी व केंद्र शासनाने लागू केलेल्या वेतन आयोगात फेरफार न करता लागू करावा या मागणीसाठी शिक्षकांनी शनिवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली.शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्र.ह. दलाल, जिल्हा कार्यवाहक अनंत शिंदे, एम.ए. पाटील, श्रीकांत तायडे एस.एस.अहिरे यांच्या नेतृत्त्वाखाली निदर्शने करण्यात आली. यात जी.व्ही.पाटील, अनिल पाटील, संध्या शिंदे, प्रतिभा चव्हाण, शुभांगी पाटील, गिरीश नेमाडे, आर.के.तायडे, सुनील अत्तरदे यांच्यासह शिक्षकांनी सहभाग नोंदविला.यावेळी शिक्षकांनी सन २००५ पासून बंद करण्यात आलेली जुनी पेन्शन योजना त्याच दिवसापासून पुनश्च विनाअट सुरु करण्यात यावी. केंद्र शासनाने त्यांच्या कर्मचाºयांना लागू केलेला सातवा वेतन आयोग फेरफार न करता विनाविलंब लागू करीत सर्व थकबाकी हप्त्यात रोखीने मिळावी. तसेच अनुदानित शाळेत विनाअनुदानित तत्त्वावर ज्या तुकड्या/वर्ग सुरु करण्यात आले, त्यांचे पुन्हा मुल्यांकन न करता सर्वांना विनाअट त्वरीत टप्प्याटप्यांनी अनुदान सुरु करावे अशी मागणी करण्यात आली. यावेळी प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर शिक्षक परिषदेच्या पदाधिकाºयांनी आपल्या विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाºयांना दिले. निदर्शने आंदोलनात जिल्हाभरातील शिक्षक परिषदेचे सदस्य सहभागी झाले.
शिक्षक परिषदेचे जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2018 3:58 PM
सातवा वेतन आयोग फेरफार न करता लागू करण्याची केली मागणी
ठळक मुद्दे सन २००५ पासून बंद करण्यात आलेली जुनी पेन्शन योजना त्याच दिवसापासून पुनश्च विनाअट सुरु करा केंद्र शासनाने त्यांच्या कर्मचाºयांना लागू केलेला सातवा वेतन आयोग फेरफार न करता विनाविलंब लागू करीत सर्व थकबाकी हप्त्यात रोखीने मिळावी.अनुदानित शाळेत विनाअनुदानित तत्त्वावर ज्या तुकड्या/वर्ग सुरु करण्यात आले, त्यांचे पुन्हा मुल्यांकन न करता सर्वांना विनाअट त्वरीत टप्प्याटप्यांनी अनुदान सुरु करा.