दरम्यान, याप्रश्नी शेतकरी बचाव कृती समितीमधील काही ज्येष्ठ मार्गदर्शक व पीडित शेतकऱ्यांची तब्येत बिघडल्यामुळे आज चौथ्या दिवशीही मुंबईत आझाद मैदानावर आंदोलनात ज्येष्ठ मार्गदर्शक हभप काशिनाथ जाधव माउली, अध्यक्ष ॲड. भरत चव्हाण, सचिव भीमराव जाधव व इतर उपस्थित होते.
आमच्या न्याय हक्कासाठी आझाद मैदानावर चौथ्या दिवशीही सुरू असलेल्या आंदोलनात शेतकरी बचाव कृती समितीच्या कार्यकर्त्यांचे मनोधैर्य वाढावे, त्यांना लढण्यास बळ मिळावे म्हणून पीडित शेतकऱ्यांनी आपल्या गावात निदर्शने करून घोषणाबाजी करीत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
शासनाकडून एसआयटीमार्फत सोलर प्रकल्पाची चौकशी झालीच पाहिजे, आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे, शेतकरी बचाव कृती समितीचा विजय असो, आझाद मैदान आंदोलन कामयाब हो, अशा घोषणा व निदर्शने करण्यात येत होती. पुढील एक ते दोन दिवसात आंदोलनाची दखल घेऊन शासनाने मागणी मान्य न केल्यास आम्ही सर्व पीडित शेतकरी सोलर प्रकल्प स्थळावर तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडू असा इशारा पीडित शेतकऱ्यांनी दिला आहे.
गौताळा अभयारण्याच्या संवेदनशील क्षेत्रात या प्रकल्पाचे बेकायदा काम सुरू असताना लोकप्रतिनिधी या नात्याने शेतकरी बचाव कृती समितीने अनेक वेळा निवेदने देऊन या प्रकल्पाचे गैरव्यवहार लक्षात आणून दिले होते व न्याय हक्कासाठी याचना करूनही मौनी लोकप्रतिनिधी यांच्याकडे या पीडितांकडे लक्ष द्यायला वेळ देत नाही, असा आरोप आहे. सरकारी प्रकल्प असल्याचे खोटे सांगून स्वस्तात जमिनी हडप केल्या जात होत्या. असा आरोप शेतकरी बचाव कृती समितीचे सचिव भीमराव जाधव यांनी यावेळी केला.
फोटो मॅटर
मुंबईत आझाद मैदानावर सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून चाळीसगाव तालुक्यातील बोढरे येथे पीडित शेतकऱ्यांनी शुक्रवारी निदर्शने करून जोरदार घोषणाबाजी केली. त्या प्रसंगाचे छायाचित्र.
२५/५