पोलीस गायब
जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात रात्रीची संचारबंदी लागू केली असली तरी शहरात रात्रीच्यावेळी नागरिकांचे फिरणे सुरूच आहे. शहरातील विविध चौकात केवळ बॅरिकेट्स लावलेले दिसतात मात्र याठिकाणी पोलीस नसल्याने रात्रीचा संचार सुरू आहे.
अपघाताचा धोका
जळगाव : महामार्गावर ठिकठिकाणी काम सुरू असल्याने वळण रस्ते करण्यात आले आहे. यात वेळ वाचावा म्हणून अनेक जण मू.जे. महाविद्यालयाकडून अग्रवाल चौक मार्गे ये-जा करतात. या ठिकाणी चारही बाजूने वेगाने वाहने येत असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे.
गर्दी कायम
जळगाव : कोरोनाचा संसर्ग वाढत असला तरी नागरिक भाजीपाला व मांसच्या दुकानावर गर्दी करत असल्याचे चित्र आहे. रविवारी अनेक ठिकाणी अशी गर्दी दिसून आली.
रस्त्याची दुरावस्था
जळगाव : शहरात अनेक भागात रस्त्यांची दुरवस्था झाल्याने नागरिक त्रस्त आहेत. यात काव्यरत्नावली चौक ते गिरणा टाकी पर्यंत रस्त्याची देखील मोठी दुरवस्था झाली आहे. यामुळे वाहनधारकांचे चांगलेच हाल होत आहे.