आॅनलाईन लोकमतजळगाव, दि. १६ - लोकहित को.आॅप हॉस्पिटल अॅण्ड रिसर्च सेंटर ने सर्वसामान्य रुग्णांचे लोकहित जोपासून त्यांना माफक दरात आरोग्य सेवा उपलब्ध करुन द्यावी, असे आवाहन सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी शुक्रवारी जिल्हा उपनिबंधक कार्यालयात झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात केले.उत्तर महाराष्ट्रात प्रथमच सुरु होणाºया लोकहित को.आॅप हॉस्पिटल अॅण्ड रिसर्च सेंटरची नोंदणी सहकार विभागाकडे करण्यात आली आहे. या सेंटरला नोंदणी प्रमाणपत्र सहकार राज्यमंत्र्यांच्या हस्ते देण्यात आले.याप्रसंगी जिल्हा उपनिबंधक विशाल जाधवर, जिल्हा परिषद सदस्य पवन सोनवणे, सेंटरचे मुख्य प्रवर्तक डॉ.एस.एस.राणे यांचेसह प्रवर्तक सुनील पाटील, डी.एन.पाटील, छबीलदास शहा, यु.डी.चौधरी, एन.एस.पाटील, डॉ.प्रताप जाधव, संजय शहा, अरुण भारंबे, धनाजी राणे, डॉ. सुरेश राणे उपस्थित होते.गुलाबराव पाटील म्हणाले की, सध्याच्या काळात सर्वसामान्यांना नागरीकांना माफक दरात आरोग्यसेवा मिळतांना अडचणी येतात. ही अडचण लक्षात घेऊन जळगावातील मान्यवरांनी एकत्र येऊन आरोग्य, सेवा आणि सहकार या त्रिसुत्रीवर आधारित या उपक्रमाला सुरुवात केली आहे. या सेंटरच्या माध्यमातून सामाजिक भावना जोपासून व लोकहित नजरेसमोर ठेवून गोरगरीब जनतेला अत्यल्प दरात आरोग्य सेवा उपलब्ध करुन द्यावी. त्यासाठी आवश्यक ती मदत करण्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.प्रास्ताविक जिल्हा उपनिबंधक विशाल जाधवर यांनी केले. मुख्य प्रवर्तक डॉ.राणे म्हणाले की, संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांकरीता मोफत जेवण व निवास व्यवस्था उपलब्ध करुन देण्यात येत आहे. त्याचबरोबर संस्थेचे १८ हजार ग्रंथ व पुस्तके असलेले पॉल हॅरिस सुसज्ज ग्रंथालय व लोकहित वाचनालय आहे. त्याचबरोबर संस्थेच्यावतीने जिल्ह्यात सात लोकहित दवाखाने, ७ माफक दरातील लोकहित जेनरिक मेडिकल व गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाकरीता आर्थिक मदत करण्यासाठी लक्ष्मीबाई कर्मवीर भाऊराव पाटील विद्यार्थी सहाय्य योजना हे उपक्रम राबविण्यात येत आहे. आता गोरगरीब नागरिकांना माफक दरात उपचार उपलब्ध करुन देण्यासाठी लोकहित को.आॅप हॉस्पिटल अॅण्ड रिसर्च सेंटरची नोंदणी केली असून या सेंटरच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला अत्यल्प दरात उपचार उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. सुत्रसंचलन एम.पी.देवरे यांनी केले.
सर्वसामान्यांना माफक दरात आरोग्य सेवा उपलब्ध करुन द्या : सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2018 9:54 PM
लोकहित को.आॅप हॉस्पिटल अॅण्ड रिसर्च सेंटर ला नोंदणी प्रमाणपत्र प्रदान
ठळक मुद्देलोकहित को.आॅप हॉस्पिटल अॅण्ड रिसर्च सेंटरची सहकार विभागाकडे नोंदणीसहकार राज्यमंत्र्यांकडून आवश्यक त्या मदतीचे आश्वासनसहकार राज्यमंत्र्यांचे हस्ते नोंदणी प्रमाणपत्राचे वितरण