जळगाव : शासकीय रेशन दुकानदारांच्या विविध समस्या व मागण्यांसंदर्भात रेशन दुकानदार संघटनेतर्फे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांना निवेदन देण्यात आले. दुकानदारांना ५० लाखाचा विमा संरक्षण कवच मिळावे तसेच कोरोना काळात जिल्ह्यात मृत्यू झालेल्या दुकानदारांच्या परिवारांना आर्थिक मदत करावी व घरातील एका व्यक्तीचा सरकारी नोकरीत समावेश करावा, अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या.
राज्य शासनाने प्रति क्विंटल २७० रुपये मार्जिन द्यावे, दुकानदारांना शासकीय शिपाई पदाचा दर्जा द्यावा, खराब झालेल्या ई-पॉस मशीन बदलून द्याव्यात, असेही निवेदनात म्हटले आहे. रेशन दुकानदार संघटनेचे अध्यक्ष अनिल अडकमोल यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले. यावेळी कार्याध्यक्ष नवनाथ दारकुंडे, सचिव रत्नमाला काळुखे, रिटा सपकाळे, उपाध्यक्ष सुभाष जैन, सुभाष पांडे, विनोद पांडे, प्रदीप देशमुख, फिरोज पठाण, कुसुम शाह नितीन सपके, शैलेश परदेशी, श्याम नाथ, अतुल हराळ, हेमरत्न काळुंखे, मुन्ना परदेशी, हिमांशू तिवारी, संजय घुगे, हिम्मत पाटील, पप्पू सपकाळे, अशपाक बागवान, रमजान मुलतानी, नरेंद्र पाटील, दत्तू पाटील, बाळा महागडे, शैलेश कटारिया, इंदूबाई ठाकूर दिलीप शिरोडे, हिरामण सोनवणे, फक्रूद्दिन बोहरी, प्रताप बनसोडे यांच्यासह दुकानदार पदाधिकारी उपस्थित होते.